Join us  

Raj Thackeray : 'ज्यांनी शिवाजी पार्कातले एक झाड दत्तक घेतले नाही, ते गावाबद्दल बोलतात'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 12:10 PM

राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून सभांमध्ये मोदींच्या भाषणाचे व्हिडीओ दाखवत भाजपविरोधी प्रचार केला होता. याविरोधात भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या शेवटच्या दिवशी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. 

मुंबई : राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दत्तक गावावर टीका केली होती. यावर भाजपाच्या आशिष शेलार यांनी मोदींनी दत्तक घेतलेल्या गावाचा व्हिडीओ दाखवून सत्य दाखविले. तसेच तुम्ही करताय तो विपर्यास, आमचे खासदार करतात तो प्रयास, अशी टीका केली. ज्या माणसाने शिवाजी पार्कवरचं एक गावही दत्तक घेतलं नाही ते गाव काय दत्तक घेणार, असा उपरोधिक सवालही त्यांनी उपस्थित केला. 

राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून सभांमध्ये मोदींच्या भाषणाचे व्हिडीओ दाखवत भाजपविरोधी प्रचार केला होता. याविरोधात भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या शेवटच्या दिवशी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. 

राज ठाकरेंच्या नोटाबंदीतील घोटाळ्याच्या आरोपावरही शेलार यांनी पुरावे मांडले. नोटाबंदी हा एका रात्रीत आलेला निर्णय नाही, काळा पैसा बँकेत जमा करा, कर भरा असं आवाहन आधी करण्यात आलं होतं. जनतेशी संवाद साधाला सरकारने. काळ्या पैशावर प्रहार करणं हे माझं कर्तव्य असं मोदींनी आधीचं संगितलं  होतं. नोटाबंदीनंतर 3 लाख 34 हजार बनावट कंपन्या बंद झाल्या मग हा घोटाळा आहे का? नोटबंदी नंतर टॅक्सचं कलेक्शन हे 7 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढलं. इनकम टॅक्स भरणारे 3 कोटी 80 लाख होते ते नोटबंदीनंतर 6 कोटी 86 लाख झाले. घराच्या किंमती कमी झाल्या, असे मुद्दे मांडले. 

तसेच महाराष्ट्रातील बलात्काराच्या घटनांची आकडेवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडलेले भाषणही दाखविले. निर्भया प्रकरण, जनजागृतीमुळे बलात्काराच्या तक्रारींध्ये वाढ झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता. यानंतर तक्रारी वाढल्या, त्या महिलेला संरक्षण देणे सरकारचे काम आहे, असे शेलार म्हणाले. 

यानंतर एक लहान मुलगी राहुल गांधी पप्पू आहे, असा मोदींसोबतचा खरा व्हिडीओ असल्याचा दावा राज ठाकरे यांनी एका मुलाखती वेळी केला होता. हा व्हिडीओ मॉर्फ करून आवाज बदलण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी खरा व्हिडीओ दाखवत ठाकरेंच्या आरोपांची पोलखोल केली. 

Raj Thackeray :'आता बघाच तो व्हिडीओ'मधून राज ठाकरेंच्या दाव्यांची भाजपाकडून पोलखोल

 

जवानांच्या नावांनी राजकारण करत आहेत, असा मोदींवर आरोप आहे. खरा प्रश्न आणि खरं उत्तर ऐका मग तुम्हालाही प्रश्न पडेल काय बोलतो हा माणूस? व्हेरिफाईड इंटरव्ह्यूमधून काही मिळत नाही व्हिडीओ अर्धवट कापला. रामदास पाध्यांच्या बोलक्या बाहुल्यांमधले तुम्ही अर्धवट राव तर नाही ना? असा प्रश्न विचारत राज ठाकरे यांची खिल्ली उडविली.  

पुलवामा हल्ल्यावरून अमित शहा यांनी केलेल्या मृतांच्या दाव्यावरूनही त्यांनी अमित शहा यांच्या ट्विटची वेळ दाखविली. तसेच दहशतवाद्यांचा आकडा काही दिवसांनंतर मांडल्याचा खुलासा शेलार यांनी केला. 

टॅग्स :राज ठाकरेआशीष शेलारमनसेभाजपानरेंद्र मोदी