Raj Thackeray :'आता बघाच तो व्हिडीओ'मधून राज ठाकरेंच्या दाव्यांची भाजपाकडून पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 11:28 AM2019-04-27T11:28:02+5:302019-04-27T13:23:42+5:30

रंगशारदामध्ये भाजपाकडून राज ठाकरेंच्या आरोपांवर प्रत्युत्तर

Bjp is targeting Raj Thackrey's allegations on Narendra Modi by Video | Raj Thackeray :'आता बघाच तो व्हिडीओ'मधून राज ठाकरेंच्या दाव्यांची भाजपाकडून पोलखोल

Raj Thackeray :'आता बघाच तो व्हिडीओ'मधून राज ठाकरेंच्या दाव्यांची भाजपाकडून पोलखोल

Next

मुंबई : राज ठाकरे यांनी 32 वेगवेगळे आरोप केले आहेत. त्यांनी दाखविलेले व्हिडीओ हे भाजपाच्या कोणत्याही अधिकृत संकेतस्थळावरून घेतलेले नाहीत. दाखविलेले पुरावे माहिती अधिकारातून घेतलेले नाहीत. यामुळे त्यांच्या यापैकी 19 आरोपांची पोलखोल भाजपचे प्रवक्ते आशिष शेलार यांनी केली. 


खोटं बोल रेटून बोल हे तुमच्याकडून महाराष्ट्र शिकतोच आहे. राज ठाकरे यांना 'मित्रा तू चुकलास' असा इशारा दिला. यावेळी त्यांनी पहिला व्हिडिओ राज यांच्या सभेतील राहुल गांधीना सत्ता देऊन पाहू या विधानाचा दाखविला. यानंतर अजित पवारांवर राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांनी कसे झापले याचा व्हिडिओ दाखविला. तसेच तेव्हा केलेली टीकाही त्यांनी दाखविली. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर राज ठाकरे यांनी मिमिक्री केलेल्या टीकेचे व्हिडीओ या रंगशारदामधील सभेवेळी दाखविण्यात आले. 

तुम्ही मोदींना प्रश्न विचारताय, त्या पक्षाचे महाराष्ट्रात खासदार 22, आमदार 122, महापौर 16, नगरसेवकांसाठी दोन सभागृहे लागतील, अशी आकडेवारी मांडत सरपंचांची आकडेवारी सांगितली तर राज ठाकरेंची पळता भुई थोडी होईल असा टोला शेलार यांनी लगावला. 
ज्या पक्षाच्या स्थापनेला असलेले नेते आज या मनसेमध्ये आहेत का? असे म्हणत शेलार यांनी या नेत्यांची नावे वाचून दाखविली. शिशिर शिंदे, प्रविण दरेकर, वसंत गिते, श्वेता परुळेकर, अतुल सरपोतदार, दिगंबर कांदळकर अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या पक्षाच्या स्थापनेला जे लोक व्यासपीठावर होते, त्यापैकी आज एकच व्यक्ती मनसेसोबत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. 

अकाऊंट व्हेरीफाईड नाही, सोर्स व्हेरिफाईड नाही, भाजपाशी संबंध नाही अशा व्यक्तींचा पोस्ट दाखवल्या जातात. आमचं नाणं शंभर टक्के खरं, मोदींनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळची गर्दी पाहा. आमचा संबंध नसलेल्या अकाऊंट वरून आमची बदनामी करता पण यातून तुम्ही जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहात, अशी टीकाही त्यांनी केली.

Raj Thackeray : 'ज्यांनी शिवाजी पार्कातले एक झाड दत्तक घेतले नाही, ते गावाबद्दल बोलतात'

 

Web Title: Bjp is targeting Raj Thackrey's allegations on Narendra Modi by Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.