राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या पीएनबी खात्याचीही चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:06 IST2021-07-27T04:06:19+5:302021-07-27T04:06:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीचे संयुक्त खाते आहे. या खात्यातून ...

Raj Kundra and Shilpa Shetty's PNB account was also investigated | राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या पीएनबी खात्याचीही चौकशी

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या पीएनबी खात्याचीही चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीचे संयुक्त खाते आहे. या खात्यातून दोघांनी कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केल्याचे समजते. पोर्नोग्राफी प्रकरणाशी संबंधित काही व्यवहार या खात्यातून झाले आहेत का? याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

कुंद्राच्या विविध बँक खात्याची सध्या चौकशी सुरू आहे. पीएनबी बँकेतील संयुक्त खात्यासह या बँकेत कुंद्राचे आणखी खाते आहे. मात्र यात, २०१६ पासून एकही व्यवहार झालेला नाही. या खात्यामध्ये आवश्यक असलेली कमीत कमी जमा रक्कमदेखील ठेवण्यात आली नव्हती.

गुन्हे शाखा सध्या या खात्यातून काही काळ्या पैशांचा व्यवहार झाला आहे का? याबाबत अधिक तपास करत आहेत. कुंद्रा याच्या कार्यालयातून जप्त केलेल्या अन्य दस्तऐवजांद्वारेही पथक अधिक तपास करत आहे. तसेच त्यांच्या नातेवाईक, मित्रमंडळीच्या खात्याचीही यात चौकशी होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

पुन्हा कोठडी वाढवून मागणार

राज कुंद्रा याची २७ तारखेला वाढीव कोठडी संपत असल्याने कुंद्रा आणि साथीदार रायन थॉर्पला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यात त्यांच्या वाढीव कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याचे समजते.

Web Title: Raj Kundra and Shilpa Shetty's PNB account was also investigated