माथेरानची राणी चार महिने विश्रांतीवर

By Admin | Updated: June 14, 2015 23:22 IST2015-06-14T23:22:37+5:302015-06-14T23:22:37+5:30

सर्वांची लाडकी माथेरानची राणी १५ आॅक्टोबर ते १५ जून या आठ महिन्यांच्या कालावधीत उतारवयात देखील धडपडत डोंगर-दऱ्यांच्या अवघड वळणातून

Queen of Matheran for four months rest | माथेरानची राणी चार महिने विश्रांतीवर

माथेरानची राणी चार महिने विश्रांतीवर

माथेरान : सर्वांची लाडकी माथेरानची राणी १५ आॅक्टोबर ते १५ जून या आठ महिन्यांच्या कालावधीत उतारवयात देखील धडपडत डोंगर-दऱ्यांच्या अवघड वळणातून पर्यटकांना माथेरान दाखविण्याचे काम करीत असते. मात्र पावसाळ्यामध्ये चार महिने दरड कोसळण्याची शक्यता असल्याने रेल्वे प्रशासन मिनीट्रेन सेवा बंद करते.
शंभरी पार केलेल्या या मिनीट्रेनचे रेल्वे प्रशासनाला भरीव उत्पन्न मिळते परंतु नवीन इंजिन्स उपलब्ध करण्याबाबत नेहमीच उदासीनता दाखविली जाते. निदान चार महिन्यांमध्ये तरी डबघाईला आलेल्या इंजिन्सची दुरूस्ती केल्यास आठ महिन्यांच्या काळात पर्यटकांना उत्तम प्रकारे सेवा मिळू शकेल अशी अपेक्षा पर्यटकांना आहे.
चार महिने पर्यटकांना डोंगर- दऱ्यांचा आनंद घेता येणार नाही मात्र या काळात अमनलॉज ते माथेरान शटलसेवा सुरू राहणार असल्याने मिनीट्रेनमध्ये बसता येणार आहे. १५ जून रोजी दुपारी २.२५ वाजण्याची शेवटची नेरळला जाणारी गाडी असणार आहे अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
शटलट्रेन दररोज मुक्कामी नेरळला जाणार असून नियमितपणे माथेरानकडे रवाना होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी, राज्य रेल्वे मंत्र्यांनी मिनीट्रेनच्या सेवेकडे गांभीर्याने पाहून पर्यटकांना चांगली सेवा द्यावी असे येथील नागरिकांसह, पर्यटकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)

Web Title: Queen of Matheran for four months rest