कोविड योद्ध्यांना निवारा देणाऱ्या १६७ हॉटेलचा मालमत्ता कर माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 01:17 AM2020-09-23T01:17:33+5:302020-09-23T01:18:45+5:30

महापालिकेचा निर्णय : एकूण २२ कोटींची सवलत

Property tax exemption for 167 hotels sheltering Kovid warriors | कोविड योद्ध्यांना निवारा देणाऱ्या १६७ हॉटेलचा मालमत्ता कर माफ

कोविड योद्ध्यांना निवारा देणाऱ्या १६७ हॉटेलचा मालमत्ता कर माफ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाविरुद्ध लढ्यात दिवस-रात्र काम करणाºया डॉक्टर्स, परिचारिका, पालिका अधिकारी- कर्मचारी तसेच संशयित रुग्णांना निवारा देणाºया १६७ हॉटेल्सचा तीन महिन्यांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. असा सुमारे २२ कोटी रुपयांचा मालमत्ता कर आरोग्य विभागामार्फत पालिकेच्या तिजोरीत जमा केला जाणार आहे.


मार्च महिन्यापासून मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर रुग्णांच्या सेवेसाठी युद्धपातळीवर काम सुरू झाले. यासाठी पालिकेचे डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी हे दिवस-रात्र काम करीत होते. त्यामुळे त्यांना कार्यालयाच्या आसपासच राहणे आवश्यक होते. अशा कोविड योद्ध्यांच्या राहण्याची व्यवस्था मुंबईतील हॉटेल्समध्ये गेले तीन महिन्यांच्या कालावधीत करण्यात आली होती.


अशा वेळी पालिकेच्या मदतीला धावून आलेल्या १६७ हॉटेल्स मालकांनी तब्बल पाच हजार खोल्या कोविड योद्ध्यांसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. परदेशातून मुंबईत येणाºया नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था हॉटेलमध्येच करण्यात आली होती.
तसेच संशयित रुग्णांच्या विलगीकरणासाठी खोल्यांची आवश्यकता असल्याने अशा काही हॉटेल्समध्ये त्यांची सवलतीच्या दरात व्यवस्था करण्यात आली होती.

असे होते सवलतीचे दर
तारांकित हॉटेल्समध्ये एका दिवसाचे भाडे दहा हजारांहून अधिक असते. मात्र कोविड काळात १६७ हॉटेल्सच्या जागेत महापालिकेने तिथे कोविड योद्धा व संशयित रुग्णांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. यासाठी ठरावीक दर निश्चित करण्यात आले होते. पंचतारांकित हॉटेलमध्ये दररोजचे भाडे साडेतीन हजार रुपये, चार तारांकित हॉटेलमध्ये २४०० रुपये, तीन तारांकित हॉटेलमध्ये दोन हजार रुपये, सर्वसाधारण हॉटेलमध्ये दीड हजार रुपये देण्यात येत होते.

Web Title: Property tax exemption for 167 hotels sheltering Kovid warriors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.