समस्या संपता संपेनात

By Admin | Updated: August 2, 2014 02:16 IST2014-08-02T02:16:07+5:302014-08-02T02:16:07+5:30

कांदिवली पूर्व येथील ठाकूर व्हिलेज येथील गेल्या वर्षभरापासून अनेक समस्या कायम असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत

Problems ending in the end | समस्या संपता संपेनात

समस्या संपता संपेनात

जयाज्योती पेडणेकर, कांदिवली
कांदिवली पूर्व येथील ठाकूर व्हिलेज येथील गेल्या वर्षभरापासून अनेक समस्या कायम असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. आधीच गृहसंस्थांच्या समस्यांनी त्रस्त असलेले नागरिक या इमारतीतील सुविधांच्या अभावामुळे आणखी त्रस्त होतात.
ठाकूर व्हिलेज येथील संस्कृती या तीनमजली इमारतीत उपनिबंधक कार्यालय आहे . या इमारतीचे पहिले दोन मजले रिकामे असून उपनिबंधक कार्यालय तिसऱ्या मजल्यावर आहे. गोरेगाव ते दहिसर परिसरातील गृहनिर्माण संस्थांचे कामकाज येथे होते. तीन वर्षांपूर्वी उपनिंबधक कार्यालय येथे स्थलांतरित करण्यात आले. हे कार्यालय आर मध्य पालिका विभागाअंतर्गत येते. मात्र या कार्यालयाच्या देखभालीकडे आर मध्य पालिका जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथे येणारे नागरिक करत आहेत.
या इमारतीतील लिफ्ट वारंवार बंद पडते. इमारत परिसरात व लिफ्टमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला आहे. लिफ्ट बंद पडल्याने कार्यालयात येणाऱ्या नागरिक व कर्मचाऱ्यांना जिने चढून तिसरा मजला गाठावा लागतो. जिन्याच्या दोन पायऱ्यांमधील उंची अधिक असल्याने ज्येष्ठ नागरीकांना जिने चढता उतरताना त्रास होतो. या कार्यालयात पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नाही तर शौचालयही वाईट अवस्थेत आहे. महत्त्वाच्या कागदपत्रांचे बांधून ठेवलेले धूळखात एका कोपऱ्यात पडले आहेत. पंखे असूनही बंद अवस्थेत असल्याचे पहायला मिळते. याबाबत आर मध्य पालिका विभाग सहायक आयुक्त किशोर गांधी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाहीत.

Web Title: Problems ending in the end