पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 06:39 IST2025-10-29T06:39:11+5:302025-10-29T06:39:29+5:30
‘मेरिटाइम लीडर्स कॉन्क्लेव्ह’ला संबोधित करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी मुंबई दौऱ्यावर असून, दुपारी ४ वाजता ते ‘इंडिया मेरिटाइम वीक २०२५’ अंतर्गत आयोजित ‘मेरिटाइम लीडर्स कॉन्क्लेव्ह’ला संबोधित करणार आहेत. तसेच ‘ग्लोबल मेरिटाइम सीईओ फोरम’चे अध्यक्षस्थानही ते भूषविणार आहेत. हा कार्यक्रम गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे होणार आहे.