पोलिसांचा रक्तदाब वाढला

By Admin | Updated: May 1, 2015 22:28 IST2015-05-01T22:28:58+5:302015-05-01T22:28:58+5:30

अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे यांनी भिवंडीत आयोजित केलेल्या पोलीस व कर्मचाऱ्यांच्या शारीरिक तपासणी शिबिरात बहुतांशी पोलिसांचा रक्तदाब वाढल्याचे दिसून आले.

Police blood pressure increased | पोलिसांचा रक्तदाब वाढला

पोलिसांचा रक्तदाब वाढला

भिवंडी : अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे यांनी भिवंडीत आयोजित केलेल्या पोलीस व कर्मचाऱ्यांच्या शारीरिक तपासणी शिबिरात बहुतांशी पोलिसांचा रक्तदाब वाढल्याचे दिसून आले.
शहरातील पोलीस नियंत्रण कक्षाशेजारील पोलीस संकुलात स्थानिक पोलिसांचे शारीरिक तपासणी शिबिर आयोजित केले होते. याचे उद््घाटन पोलीस उपायुक्त सुधीर दाभाडे यांनी केले.
शहरातील सहा पोलीस ठाण्यांतील २०० पोलिसांची नाडीपरीक्षा, रक्तदाब, बॉडीस्कॅनिंग व मधुमेहाची तपासणी करण्यात आली. त्या वेळी बहुतांश पोलिसांचा रक्तदाब वाढल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मुंबईतील घाटकोपरमधील युनिकेअर हेल्थ सेंटरचे डॉ. पांडुरंग शिंदे व त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी पोलिसांची शारीरिक तपासणी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Police blood pressure increased