पार्किंगवरून पोलिसांशी हुज्जत

By Admin | Updated: June 16, 2015 01:39 IST2015-06-16T01:39:41+5:302015-06-16T01:39:41+5:30

डबल पार्किंगमध्ये लावलेली गाडी काढण्यास सांगितल्याने वरळी पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या सुरेंद्र देसाई याला गजाआड करण्यात आले.

Parking with the police on the parking lot | पार्किंगवरून पोलिसांशी हुज्जत

पार्किंगवरून पोलिसांशी हुज्जत

मुंबई : डबल पार्किंगमध्ये लावलेली गाडी काढण्यास सांगितल्याने वरळी पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या सुरेंद्र देसाई याला गजाआड करण्यात आले. हा प्रकार सकाळी वरळी-महालक्ष्मी मार्गावरील कुबेरा हॉटेलसमोर घडला.
वरळीचे वरिष्ठ निरीक्षक विनय कुलकर्णी गस्तीवर असताना त्यांना एक कार डबल पार्किंगमध्ये असल्याने त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याचे दिसले. ही कार येथून काढा, असे कुलकर्णी यांनी सांगताच कार मालक देसाई याने त्यांना शिवीगाळ केली. इतकेच करून तो थांबला नाही तर तो पोलिसांवर धावूनही गेला. भररस्त्यात घडलेल्या या प्रकाराने पोलीसही हबकून गेले.
देसाई हा पूर्वी स्वाभिमान संघटनेशी संबंधित होता. देसाई याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. त्याच्याविरोधात तब्बल चार वेळा एमपीडीएची कारवाई करण्यात आल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी देसाई याला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत धाडले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Parking with the police on the parking lot