ऑक्टोबरमध्ये पुन्हा म्हाडा घरांसाठी संधी, पावणेपाच हजार घरांची निघणार लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 08:51 AM2023-08-26T08:51:10+5:302023-08-26T08:51:25+5:30

आधीच्या लॉटरीतील १ लाख १६ हजार म्हाडा अर्जदारांची अनामत परत

Opportunity for old houses again in October | ऑक्टोबरमध्ये पुन्हा म्हाडा घरांसाठी संधी, पावणेपाच हजार घरांची निघणार लॉटरी

ऑक्टोबरमध्ये पुन्हा म्हाडा घरांसाठी संधी, पावणेपाच हजार घरांची निघणार लॉटरी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४ हजार घरांच्या लॉटरीत अपयशी ठरलेल्या अर्जदारांना पुन्हा एकदा घरासाठी अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. कारण, म्हाडाच्या कोकण मंडळाच्या वतीने ऑक्टोबर महिन्यात सुमारे पावणेपाच हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. या लॉटरीमधील घरांच्या किमती पावणे दहा लाखांपासून ४२ लाखांपर्यंत आहेत. 
कोकण मंडळाच्या १० मेच्या लॉटरीत विकली गेली नाहीत; अशा घरांसह विविध योजनांतील घरांचा समावेश ऑक्टोबरच्या लॉटरीत करण्यात येणार आहे.

  • ११ सप्टेंबरच्या आसपास घरांची जाहिरात प्रसिद्ध होईल.
  • पनवेल आणि कल्याण, डोंबिवलीमध्ये ही घरे आहेत. 
  • वसई, वढवली, विरार येथेही लॉटरीमधील घरे आहेत.
  • वसई, विरार येथील घरांच्या किमती अधिक असण्यासह प्रकल्पाला पाणीही मिळालेले नाही. त्यामुळे या घरांकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे.


१ लाख १६ हजार म्हाडा अर्जदारांची अनामत परत

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सुमारे ४ हजार घरांच्या लॉटरीत अयशस्वी ठरलेल्या अर्जदारांची अनामत रक्कम म्हाडाने परत करण्यास सुरुवात केली आहे. त्यनुसार, लॉटरीमध्ये अयशस्वी ठरलेल्या १,१६,०६६ अर्जदारांना अनामत रकमेचा परतावा म्हाडाकडून करण्यात आला आहे. ४२९ कोटी रुपये अर्जदारांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. दरम्यान, ४ हजार ८२ घरांसाठी १ लाख २० हजार १४४ अर्ज आले होते. लॉटरीनंतर अयशस्वी अर्जदारांची अनामत रक्कम अर्जदारांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली. मात्र काही काहींनी चुकीचा खाते क्रमांक दिल्याने रक्कम जमा झाली नाही. 

Web Title: Opportunity for old houses again in October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.