आता मुंबईतील रस्ते प्लास्टीकचे!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 07:17 AM2019-11-03T07:17:45+5:302019-11-03T07:17:59+5:30

प्लास्टीकचे विघटनही होत नाही. त्यामुळे ते पडून राहते. राज्यात प्लास्टीक बंदी आहे.

Now the roads of Mumbai are plastic! | आता मुंबईतील रस्ते प्लास्टीकचे!

आता मुंबईतील रस्ते प्लास्टीकचे!

Next

मुंबई : पालिका रस्त्यांसाठी निरुपयोगी प्लास्टीकचा पुनर्वापर करणार आहे. त्यामुळे येत्या काळात प्लास्टीकचे रस्ते पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, प्लास्टीक रस्त्यांबाबत निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे, असे पालिकेचे रस्ते अभियंता संजय दराडे यांनी सांगितले. मुंबई महापालिका रस्त्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करते. परंतु पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात. राज्यातील इतर शहरांपेक्षा मुंबईत होणाऱ्या पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडतात. तर मुंबईत पावसाळ्यात प्लास्टीकमुळे गटार, नाल्यातून पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे पाणी साचते. २६ जुलै २००५ मध्ये महापूर आला होता. त्याला प्रमुख कारण हे प्लास्टीक होते, असे समोर आले आहे.

प्लास्टीकचे विघटनही होत नाही. त्यामुळे ते पडून राहते. राज्यात प्लास्टीक बंदी आहे. तरीही अनेक ठिकाणी प्लास्टीकचा वापर पाहायला मिळतो. याच प्लास्टीकचा पुर्नवापर रस्त्यांसाठी केल्यास खड्ड्यांचे प्रमाण कमी होईल. मुंबईत पाण्याचा निचरा चांगल्या रीतीने होईल, प्लास्टीक प्रदूषणापासूनही मुंबईकरांची सुटका होईल. त्यामुळे रस्त्यासाठी प्लास्टीकचा वापर करावा असा उपाय सुचविण्यात आला होता, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून प्लास्टीकच्या रस्त्याबाबत प्रयोग सुरू होते. प्लास्टीक रस्त्यांबाबत हे प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे समजते. याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे, असे पालिकेचे साहाय्यक अभियंता दराडे यांनी सांगितले.

असा असेल प्लास्टीक रस्ता
च्प्लास्टीकमध्ये बरेच प्रकार आहेत, पण केवळ निरुपयोगी प्लास्टीक वापरले आहे. डांबरी रस्त्याच्या मिश्रणात ६ ते ८ टक्के निरुपयोगी प्लास्टीकचा वापर केला जाणार आहे.
च्हे प्लास्टीक धुऊन सुकविले जाणार आहे. त्यानंतर प्लास्टीकचे तुकडे करून ते डांबराच्या मिश्रणात टाकून नंतर ते रस्ता तयार करण्यासाठी वापरले जाईल. सध्या प्लास्टीक बाटल्यांचा वापर करण्यात येणार नाही. मात्र यापुढे प्लास्टीकच्या बाटल्या उपयोगात आणण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती पालिकेचे कोस्टल रोड साहाय्यक अभियंता विशाल ठोंबरे यांनी दिली.

Web Title: Now the roads of Mumbai are plastic!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.