Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 23:27 IST

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत आता मराठीतही मेडिकल आणि इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

आमचे सरकार मातृभाषेतून शिक्षणालाही अत्यंत महत्व देत आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत आता मराठीतही मेडिकल आणि इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते मुंबई येथील शिवाजी पार्क मैदानावर आयोजित महायुतीच्या प्रचारसभेला संबोधित करत होते.

"मी सुप्रीम कोर्टाला सांगितले होते की, किमान आपण जजमेंटचा जो ऑपरेटिव्ह पार्ट असतो, तो तरी त्या पक्षकाराला त्याच्या भाषेत द्या. हा काय इंग्रजीचा झेंडा घेऊन फिरत आहात तुम्ही लोक. आज जर एखाद्या मराठी भाषिक व्यक्तीची केस सुरू असेल आणि त्याला जजमेंटचा ऑपरेटिव्ह पार्ट मराठीत हवे असेल, तर मिळणे निश्चित झाले आहे.”, अशी माहितीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली.

25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढलं -  मोदी म्हणाले, "काँग्रेस 60 वर्ष सांगत होती, गरिबी हटवणार. आपण लाल किल्ल्यावरील या पंतप्रधानांची भाषणे ऐका आणि या कुटुंबातील सर्व पंतप्रधानांची भाषणे ऐका. ते 20-25 मिनिटांच्या भाषणात 10 मिनिटे गरीबीवरच बोलायचे. निवडणुकांमधील त्यांची भाषणे ऐका, ते गरीब-गरीब-गरीब-गरीब करत माळच जपत बसायचे. लोकांच्या डोळ्यात धूळफेक करत होते आणि गरीबांना जाणीव करून देत होते की, तुम्ही तर गरीबीत जगण्यासाठीच तयार झाला आहात. या देशातून गरीबी हटवणे अशक्य वाटत होते. भावानो, या मोदीने गेल्या दहा वर्षांत 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढून दाखवले आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला."

मी मुंबईकरांच्या जवळ आलोय, तुमचे आशीर्वाद मागायला आलोय -मोदी म्हणाले, “जे अशक्य वाटायचं. ते शक्य झालं की नाही? हे कुणी केलं? कोणती ताकद आहे, ज्याने हे केलंय? (जनतेतून आवाज मोदी-मोदी-मोदी) यावर मोदी म्हणाले, मोदी नाही. ही तुमच्या मतांची ताकदी आहे. त्यामुले झाले. तुमच्या मतांचं सामर्थ्य आहे. त्यामुळे ज्यांना मुलांचं उज्ज्वल भविष्य हवं, ज्यांना शांती आणि सुरक्षा हवी, त्यांना सांगतो, तुम्ही घरातून बाहेर या आणि मतांचा उपयोग करा. माझा तुम्हाला आग्रह आहे, मी मुंबईकरांच्या जवळ आलोय. तुमचे आशीर्वाद मागायला आलोय. तुम्ही प्रचंड मतदान करा”, असं आवाहनही यावेळी नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलं.

"तुम्ही जेव्हा मतदान करायला निघाल, तेव्हा हे लक्षात असू द्या..." - गत काळातील मुंबईतील बॉम्बस्फोटांची आठवण करून देत मोदी म्हणाले, “तुम्ही जेव्हा मतदान करायला घरातून निघाल, तेव्हा लक्षात असू द्या कधी काळी बॉम्बस्फोट होत होते, घरातून बाहेर पडल्यावर सायंकाळी पुन्हा परतू की नाही याचा भरवसा नसायचा. आज आपली मुलगी अभिमानाने घरी परतू शकते, हे लक्षात ठेऊन जा आणि कमळाच्या चिन्हासमोरील बट आणि आमच्या सहकाऱ्यांच्या चिन्हांच्यां समोरील बटन दाबून मोदींना मजबूत करा. तुमचं एक मत राष्ट्र हितात मोठ्या निर्णयाचा आधार बनला आहे. यामुळे एक एक मत आवश्यक आहे." 

 

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४नरेंद्र मोदीशिक्षणशिक्षण क्षेत्रभाजपासर्वोच्च न्यायालयविद्यार्थी