आता प्रत्येक प्रभागासाठी उपायुक्त

By Admin | Updated: June 3, 2015 04:28 IST2015-06-03T04:28:08+5:302015-06-03T04:28:08+5:30

पालिकेच्या १०७ प्रभागांसाठी सात प्रभाग क्षेत्रे आहेत. प्रत्येक प्रभागाला आयुक्त कार्यालयाकडून प्रभाग अधिकारी दिला जातो. मात्र हे प्रभाग

Now the Deputy Commissioner for each division | आता प्रत्येक प्रभागासाठी उपायुक्त

आता प्रत्येक प्रभागासाठी उपायुक्त

डोंबिवली : पालिकेच्या १०७ प्रभागांसाठी सात प्रभाग क्षेत्रे आहेत. प्रत्येक प्रभागाला आयुक्त कार्यालयाकडून प्रभाग अधिकारी दिला जातो. मात्र हे प्रभाग
अधिकारी योग्य प्रकारे काम करीत नसल्याने आयुक्त मधुकर अर्दड यांनी प्रशासकीय व वित्तीय अधिकार देऊन प्रत्येक प्रभागासाठी उपायुक्त दिला आहे.
तसेच नव्याने समावेश केलेल्या २७ गावांसाठी उपायुक्त संजय घरत यांच्याकडे पदभार देण्यात आला असून त्यासह फ प्रभाग समिती कार्यालयाचा कारभारही सोपवला आहे. यासंबंधीचे आदेश आयुक्तांनी शनिवारी सायंकाळी जारी केला.
उपायुक्त सुनील लहाने यांच्याकडे अ आणि ब प्रभाग क्षेत्र कार्यालय, उपायुक्त दीपक पाटील यांच्याकडे क आणि ड प्रभाग क्षेत्र आणि उपायुक्त सुरेश पवार यांच्याकडे ग आणि ह प्रभाग क्षेत्राचा पदभार सोपवला आहे. पाच लाख रुपये खर्चाच्या निविदा मागवणे, त्याच्यासंदर्भात निर्णय घेणे, कंत्राटदारांशी करारनामा करणे, त्याला वेळोवेळी मुदतवाढ देणे हे विविध निर्णय उपायुक्तांनी त्यांच्या पातळीवर घ्यायचे आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Now the Deputy Commissioner for each division