'कॉन्सर्टमध्येच गोळ्या घेतल्या, धुंद चढली अन् पुढे काय झाले काही आठवेना...', उपचार सुरू असलेल्या तरुणीचा जबाब नोंदविला

By मनीषा म्हात्रे | Updated: April 15, 2026 12:49 IST2026-04-15T12:49:05+5:302026-04-15T12:49:41+5:30

Nesco Drugs Party: नेस्को संकुलातील कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज घेतलेल्या आणि उपचार सुरू असलेल्या तरुणीने यापूर्वीही ऑक्टोबरमध्ये जिओ वर्ल्ड येथे आयोजित इव्हेंटमध्ये देखील ‘एक्स्टॅसी’ (एमडीएमए) हे ड्रग्ज घेतल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना दिलेल्या जबाबात दिली आहे.

Nesco Drugs Party: I took pills at the concert, got drunk, and don't remember what happened next... | 'कॉन्सर्टमध्येच गोळ्या घेतल्या, धुंद चढली अन् पुढे काय झाले काही आठवेना...', उपचार सुरू असलेल्या तरुणीचा जबाब नोंदविला

'कॉन्सर्टमध्येच गोळ्या घेतल्या, धुंद चढली अन् पुढे काय झाले काही आठवेना...', उपचार सुरू असलेल्या तरुणीचा जबाब नोंदविला

- मनीषा म्हात्रे
मुंबई  - नेस्को संकुलातील कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज घेतलेल्या आणि उपचार सुरू असलेल्या तरुणीने यापूर्वीही ऑक्टोबरमध्ये जिओ वर्ल्ड येथे आयोजित इव्हेंटमध्ये देखील ‘एक्स्टॅसी’ (एमडीएमए) हे ड्रग्ज घेतल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना दिलेल्या जबाबात दिली आहे. कॉन्सर्टमध्येच नशेच्या गोळ्या घेतल्या आणि नंतर मग काय झाले हे आठवतच नसल्याचेही तिने म्हटले आहे.

बिस्मात सिंह अमरजित सिंह भसीन (२८) आणि श्रेया राय (२४) या दोघांचा मृत्यू झाला आहे. ते जमनालाल बजाज मॅनेजमेंट इंस्टिट्यूटमध्ये शेवटच्या सत्रात ते एकत्र शिकत होते. ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे त्यांची मैत्रीण शीतल साळवी (२५) हिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. शीतलने सांगितले की, ११ एप्रिल रोजी ती व तिचे २५ कॉलेज मित्र मैत्रिणी गोरेगाव पूर्वेतील नेस्को येथे ‘टेक्नो इव्हेंट’साठी रात्री साडेनऊ वाजता गेले. त्यांनी ऑनलाईन पासेस खरेदी केले होते. शीतलसोबत श्रेया रायसह अन्य मित्र मैत्रिणी होत्या. नेस्कोमध्ये आत गेल्यानंतर रौनक खंडेलवालने शीतलला गोळी दिली. श्रेयानेही गोळी घेतली. सगळे १२ वाजेपर्यंत इव्हेंटमध्ये होते. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये जिओ वर्ल्डच्या इव्हेंटमध्ये देखील हीच गोळी घेतली होती. गोळी घेतल्यानंतर धुंदी चढली आणि पुढे काय झाले हे आठवत नसल्याचे तिने सांगितले.

नागपूरची कंपनी आयोजक, तस्करांना प्रवेश
कार्यक्रमाचे आयोजक नागपूरच्या इन्स्पायरिंग टाय प्रोडक्शनचे विहान उर्फ आकाश समळ तसेच नेस्को गोरेगाव मुंबईचे आयोजक सन्नी जैन यांना अंमली पदार्थ सेवन करण्यासाठी या कार्यक्रमाच्या ठिकाणी काही जण येतात याची माहिती असतानाही प्रत्येकाची कसून तपासणी केली नाही.  
हे दोघे बिस्मात सिंह व श्रेया यांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कार्यक्रमाला फक्त १० वाजेपर्यंत परवानगी असतानाही रात्री साडेबारा वाजेपर्यंत कॉन्सर्ट सुरु होता. त्यामुळे पोलिसांच्या अटी शर्तीचे देखील उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ‘एक्स्टॅसी’ गोळी एनडीपीएस कायद्यानुसादर प्रतिबधीत अंमलीपदार्थ असल्याचेही त्यांना माहिती होते अशी माहिती समोर येत आहे.

काय घडले अन् कसे घडले?
११ एप्रिल : ९.३० वाजता विद्यार्थ्यांच्या ग्रुपची कॉन्सर्टला हजेरी, कॉन्सर्टमध्येच ड्रग्जचा पुरवठा
१२ एप्रिल : रात्री १२.३० वाजता - विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटण्यास सुरुवात
१२ एप्रिल : पहाटे २.३० - दोन तरुणी ट्रॉमा केअरमध्ये दाखल झाल्याची पोलिसांना मिळाली माहिती
१२ एप्रिल : सकाळी ७ वाजता - बिस्मात सिंह (२८) याचा लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये मृत्यू
१२ एप्रिल : दुपारी - पोलिसांकडून गुन्हा नोंदवत तपास सुरु
१३ एप्रिल : श्रेया हिचा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू

Web Title : कॉन्सर्ट में ड्रग्स: युवती को याद नहीं आगे क्या हुआ, दो की मौत

Web Summary : नेस्को कॉन्सर्ट में ड्रग ओवरडोज की शिकार युवती ने बताया कि उसने एक्स्टसी की गोलियां लीं, नशा चढ़ा और फिर कुछ याद नहीं रहा। दो अन्य की मौत हो गई। पुलिस लापरवाही और इवेंट नियमों के उल्लंघन के लिए आयोजकों की जांच कर रही है।

Web Title : Concert Drug Overdose: Girl Recalls Ecstasy Use, Memory Loss

Web Summary : A survivor of the Nesco concert drug overdose revealed taking ecstasy pills, experiencing a high, and subsequent memory loss. Two others died. Police are investigating the organizers for negligence and violating event regulations, as the event continued past curfew.