Join us
Daily Top 2Weekly Top 5

"उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही, मग पंतप्रधान कुठे आहे; ऑफिसमध्येच बसून काम करतायत ना"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 21:25 IST

प्रवीण दरेकर यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई: राज्यात कोरोना व्हायरससारखं महाभयंकर संकट असताना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचं निवास्थान असलेल्या मातोश्रीबाहेर पडत नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. तसेच राज्यभरात आज जो विस्कळीतपणा सुरु आहे, तो याआधी कधीच नव्हता असं प्रवीण दरेकर यांनी सांगितले. प्रवीण दरेकर यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही म्हणत आहे. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे आहेत. ते देखील ऑफिसमध्येच बसून काम करताय ना, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच जीएसटीचा फंड मिळत नसतानाही राज्य सरकार चांगले काम करत असल्याचे म्हणत रोहित पवार यांनी एकप्रकारे उद्धव ठाकरेंची पाठराखण केली असल्याचे बोलले जात आहे.

तुम्ही ही अ‍ॅप्स वापरताय का?; पाहा केंद्र सरकारनं बंदी घातलेल्या ११८ चिनी अ‍ॅप्सची यादी

काही अपवाध वगळता उद्धव ठाकरे घराबाहेर पडले आहे. त्यामुळे सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला होता. तसेच माझ्यासह माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील राज्यभर फिरत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडायला वेळ नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली होती.

"सर्वाधिक काळ घरात राहणारे राज्याच्या इतिहासातील उद्धव ठाकरे पहिलेच मुख्यमंत्री"

कोकणात निसर्ग वादळाने थैमान घातले. पूर्ण कोकण उध्दवस्त झाले. पण मुख्यमंत्र्यांना तिथे जायला वेळ मिळाला नाही. सांगलीला महापूर आला, सातारा, कोल्हापूर पाण्याखाली गेले, काल परवा चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा जिल्हा पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर यायला तयार नाहीत, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितले. कोरोना संदर्भात मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी आम्ही सर्व नेते मंत्रालयात दाखल झालो. तर मुख्यामंत्री, मुंबईतल्या मुंबईत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर बोलत होते, असा टोलाही प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री 15 तास काम करतात- मंत्री बाळासाहेब थोरात

राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. प्रशासन संपूर्ण काळजी घेत असून मदतकार्य विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार हेही स्वत: भागात फिरत आहेत, असे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं. आम्ही तिथं पूरस्थितीच्या ठिकाणी जाणं योग्य नसतं. प्रशासन काम करत आहे, मुख्यमंत्रीही दररोज 15 तास काम करतात. सर्वच स्थितीवर ते काम करत असून परिस्थितीवर ते बारीक लक्ष ठेऊन आढावा घेतात, असेही थोरात यांनी म्हटलं आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या-

आदित्य ठाकरेंनी ट्विटर प्रोफाइलवरून 'मंत्री' ही ओळख हटवली?; जाणून घ्या सत्य

पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना; पती- पत्नीने खातं उघडल्यास दर महिन्याला मिळेल दुप्पट फायदा

"अधिकारी आपल्या बाजूने आहे हे पाहून त्यांची बदली करुन घेण्यात उद्धव ठाकरे व्यस्त आहेत"

टॅग्स :उद्धव ठाकरेरोहित पवारप्रवीण दरेकरनरेंद्र मोदीमहाराष्ट्र सरकारभाजपाशिवसेना