नवाब मलिक यांच्या जावयला एनसीबीकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:07 AM2021-01-14T04:07:26+5:302021-01-14T04:07:26+5:30

* तस्कर सजनानीला ऑनलाइन पेमेंट लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) बुधवारी राज्याचे ...

NCB arrests Nawab Malik's son-in-law | नवाब मलिक यांच्या जावयला एनसीबीकडून अटक

नवाब मलिक यांच्या जावयला एनसीबीकडून अटक

Next

* तस्कर सजनानीला ऑनलाइन पेमेंट

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) बुधवारी राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक केली. ड्रग्ज तस्करीप्रकरणी अटक केलेल्या ब्रिटिश नागरिक करण सजनानीशी त्यांचा ड्रग्ज तस्करीतून आर्थिक व्यवहार झाल्याच्या आरोपातून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यापूर्वी या अनुषंगाने त्यांची सुमारे दहा तास सखोल चौकशी करण्यात आली. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

शनिवारी अटक केलेल्या सजनानी व अन्य दोन तरुणींकडून एनसीबीने सुमारे २०० किलो परदेशी गांजा जप्त केला आहे. करणच्या खात्यावर समीर खान यांच्याकडून ऑनलाइन २० हजार रुपये पाठविण्यात आले होते. त्यामुळे खार परिसरात राहत असलेल्या समीर यांना चौकशीसाठी समन्स बजाविले होते. त्याअनुषंगाने बेलार्ड पियार्ड येथील एनसीबीच्या कार्यालयात सकाळी १० वाजेपासून त्यांची चौकशी सुरू होती. आर्थिक अडचण असल्यामुळे त्याला पैसे दिले होते, असा खुलासा त्यांनी केला. मात्र, त्याबाबतचा सबळ पुरावा ते देऊ शकले नाहीत. त्यामुळे सुमारे ८ वाजेच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, याचप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मुच्छड पानवाला दुकानाचा सहमालक रामकुमार तिवारी याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर त्याचा जामीन मंजूर करण्यात आला.

Web Title: NCB arrests Nawab Malik's son-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.