Nawab Malik: "छत्रपतींचा जयघोष करताना हात वर नव्हते पण; ED चा..."; मनसेची मलिकांना चपराक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 09:12 AM2022-02-24T09:12:28+5:302022-02-24T10:00:32+5:30

राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असलेल्या मलिक यांना ईडीने बुधवारी सकाळीच ताब्यात घेतले. तब्बल ८ तासांच्या चौकशीनंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

Nawab Malik: 'Chhatrapati's hands were not up while chanting but; As soon as ED's horse is hit to nawab malik, MNS ameya khopkar | Nawab Malik: "छत्रपतींचा जयघोष करताना हात वर नव्हते पण; ED चा..."; मनसेची मलिकांना चपराक

Nawab Malik: "छत्रपतींचा जयघोष करताना हात वर नव्हते पण; ED चा..."; मनसेची मलिकांना चपराक

googlenewsNext

मुंबई - राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने अटक केली आहे. बुधवारी पहाटे ५ वाजता ईडीचे अधिकारी मलिकांच्या घरी पोहचले होते. त्यानंतर ७ वाजल्यापासून नवाब मलिकांची ईडीकडून चौकशी सुरु होती. ८ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्या आली. ईडीने मलिकांना विशेष कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. मलिकांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण पेटलं आहे. सोशल मीडियावरुनही समर्थन आणि विरोध दिसून येत आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. 

राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असलेल्या मलिक यांना ईडीने बुधवारी सकाळीच ताब्यात घेतले. तब्बल ८ तासांच्या चौकशीनंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तत्पूर्वी ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडत असताना मलिक यांनी बाहेर उभा असलेल्या समर्थकांना हात उंचावून आपण घाबरणार नाही, लढणार... असा आक्रमक पवित्रा दाखवून दिला. तसेच, यावेळी हात उंचावलेले मलिक यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर, मलिक यांच्या विरोधकांनी सोशल मीडियावर त्यांचे काही जुने फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यामध्ये, रागयडावर शिवाजी महाराजांचा जयघोष करताना राष्ट्रवादीचे नेते दिसून येतात. या फोटोत मंत्री नवाब मलिक हेही आहेत. मात्र, जयघोष करताना सर्वच नेत्यांनी हात उंचावून अभिवादन केलं आहे. पण, नवाब मलिक यांनी हात उंचावलेला दिसत नाही. हे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. त्यावरुन, मनसेनं मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे.   

मनचिसेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी ट्विट करुन मलिक यांच्या रायगडावरील आणि ईडी कार्यालयाबाहेरील फोटो शेअर केला आहे. तसेच, छत्रपतींचा जयघोष करताना हात वर होत नव्हते, पण ईडीचा घोडा लागताच हात वर केले... असा आशयही शेअर केला आहे. मलिक यांना न्यायालयाने 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. त्यामुळे, 3 मार्चपर्यंत आता राज्यातील राजकीय वर्तुळाच वेगवान घडामोडी पाहायला मिळतील. राष्ट्रवादी मलिक यांच्या समर्थनार्थ उतरत आहे. तर, दुसरीकडे भाजप नेते मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करत आहेत. 

Web Title: Nawab Malik: 'Chhatrapati's hands were not up while chanting but; As soon as ED's horse is hit to nawab malik, MNS ameya khopkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.