डंपरच्या धडकेत दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 07:55 IST2026-04-13T07:55:21+5:302026-04-13T07:55:33+5:30

Accident In Mumbai News: विक्रोळीच्या पूर्व द्रुतगती मार्गावर रविवारी संध्याकाळी भरधाव डम्परच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. रामनारायण संताप्रसाद यादव (५१) आणि भीमाशंकर गोपाल यादव (३५) अशी मृतांची नावे आहेत.

Mumbai News: Two killed in dumper collision | डंपरच्या धडकेत दोघांचा मृत्यू

डंपरच्या धडकेत दोघांचा मृत्यू

मुंबई -  विक्रोळीच्या पूर्व द्रुतगती मार्गावर रविवारी संध्याकाळी भरधाव डम्परच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. रामनारायण संताप्रसाद यादव (५१) आणि भीमाशंकर गोपाल यादव (३५) अशी मृतांची नावे आहेत.

दोघेही साकीनाका येथे वास्तव्यास होते. ते घर पाहण्यासाठी कल्याणला गेले होते. तेथून परतताना हा भीषण अपघात घडल्याची माहिती विक्रोळी पोलिसांनी दिली. पोलिसांनी जखमी अवस्थेत त्यांना  अन्य वाहनचालकांच्या मदतीने तत्काळ राजावाडी रुग्णालयात नेले, मात्र  दाखल करण्यापूर्वी त्यांना तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. 

डंपर चालकाविरोधात विक्रोळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याचे नाव ज्ञानेश्वर विष्णू गायकवाड असे आहे. पोलिसांनी या अपघात प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अपघात नेमका कसा घडला याची माहिती पोलिस घेत आहेत. त्यासाठी त्या भागातील सीसीटीव्ही चित्रणही तपासण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title : डंपर की टक्कर में पूर्वी एक्सप्रेसवे पर दो की मौत

Web Summary : मुंबई के विक्रोली में पूर्वी एक्सप्रेसवे पर डंपर की टक्कर में दो लोगों की मौत हो गई। साकीनाका के निवासी कल्याण से लौट रहे थे तभी यह दुर्घटना हुई। पुलिस ने डंपर चालक को गिरफ्तार कर मामले की जांच शुरू कर दी है।

Web Title : Dumper collision claims two lives on Eastern Express Highway.

Web Summary : Two individuals died in a dumper truck accident on the Eastern Express Highway in Vikhroli, Mumbai. The victims, residents of Sakinaka, were returning from Kalyan when the crash occurred. Police have arrested the dumper driver and are investigating the incident.