Mumbai Metro station will be cashless; Benefits of 4.5 million passengers | मुंबई मेट्रो वनची स्थानके होणार कॅशलेस; ४़५ लाख प्रवाशांना लाभ
मुंबई मेट्रो वनची स्थानके होणार कॅशलेस; ४़५ लाख प्रवाशांना लाभ

मुंबई : मुंबई मेट्रो वनने पुढचं पाऊल टाकत मेट्रो स्टेशन्सवर डेबिट - के्रडिट कार्डद्वारे पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे आता प्रवासी सिंगल जर्नी टोकन, रिटर्न जर्नी टोकन अशा सर्व प्रकारच्या प्रवासासाठी या सुविधेचा वापर करू शकतात. या सुविधेचा वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गाची जीवनवाहिनी झालेल्या मुंबई मेट्रो वनने प्रवास करणाऱ्या सुमारे ४.५ लाख मुंबईकर प्रवाशांना फायदा होईल.
इन्स्टामोजो या पेमेंट गेटवेने टेक्नॉलॉजी पार्टनर म्हणून ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमध्ये मेट्रो स्टेशनवर पॉस मशिन (पॉइंट आॅफ सेल) कार्यान्वित करण्याची गरज नाही. तसेच प्रवाशांना त्यांच्या स्मार्टफोनमध्ये पेमेंट अ‍ॅप्लिकेशनही डाऊनलोड करण्याची गरज नाही. त्यांचा स्मार्टफोन बनेल ई-पॉस (इलेक्ट्रॉनिक पॉइंट आॅफ सेल). प्रवाशांनी मेट्रो तिकीट काउंटरवर जाऊन स्टॅटिक क्युआर कोड स्कॅन करून किंवा काउंटरवर नमूद केलेली लिंक टाईप करून त्यांच्या डेबिट - क्रेडिट कार्डचा तपशील देऊन पेमेंट करू शकतात. त्यानंतर त्यांना त्यांचे तिकीट किंवा स्मार्ट कार्ड रिचार्ज करून मिळेल आणि ते त्यांच्या इच्छित स्थळी प्रवास करू शकतात.
स्थानकांवर उपलब्ध आहे. प्रवाशांनी तिकीट काउंटरवर नमूद केलेली लिंक त्यांच्याकडे सेव्ह केल्यास ते काउंटरवर येण्यापूर्वी किंवा आल्यावर पेमेंट प्रक्रिया पूर्ण करू शकतात. तिकीट निश्चित झाल्याचा एसएमएस ते संबंधित काउंटरवर दाखवून तिकीट घेऊ शकतात.
मुंबई मेट्रो वनच्या प्रवक्त्याने सांगितले की, नव्या सुविधेने प्रवास करणे प्रवाशांसाठी अधिक सोयीचे ठरेल याची आम्हाला खात्री आहे. लिंक-बेस्ड पेमेंट सिस्टिमला प्रवाशांकडून नक्कीच भरभरून प्रतिसाद मिळेल आणि हा उपक्रम देशातील मेट्रो यंत्रणेत महत्त्वाचा
ठरेल.

English summary :
Metro Project Update: Mumbai Metro One has made the next step, providing payment facility through debit - credit card on metro stations. So now passengers can use this facility for all types of travel like Single Journey Token, Return Journey Token. instamojo have made this payment gateway as a technology partner.


Web Title: Mumbai Metro station will be cashless; Benefits of 4.5 million passengers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.