मोटू, पतलूला भेटून छोटे दोस्त आनंदले!

By Admin | Updated: June 1, 2015 02:23 IST2015-06-01T02:23:05+5:302015-06-01T02:23:05+5:30

सर्व मुलांच्या लाडक्या ‘मोटू’, ‘पतलू’ला भेटण्याची संधी ‘लोकमत’तर्फे देण्यात आली. निकलोडियन्सचे हे मोटू आणि पतलू त्यांचा हीरो शोधत आहेत.

Motu, Patulam meet meeting small friends! | मोटू, पतलूला भेटून छोटे दोस्त आनंदले!

मोटू, पतलूला भेटून छोटे दोस्त आनंदले!

मुंबई : सर्व मुलांच्या लाडक्या ‘मोटू’, ‘पतलू’ला भेटण्याची संधी ‘लोकमत’तर्फे देण्यात आली. निकलोडियन्सचे हे मोटू आणि पतलू त्यांचा हीरो शोधत आहेत. यासाठी मुंबई विभागातील लोअर परळ येथील स्मॅश, कमला मिल कम्पाउंड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी बच्चे कंपनीने धम्माल केली.
सुट्टीचे दिवस सुरू असतानाच बच्चेपार्टीला ‘मोटू’, ‘पतलू’ला भेटून त्यांच्यासोबत फोटो काढण्याची संधी मिळाली. आपल्या लाडक्या दोस्तांना भेटल्याने या चिमुकल्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यात निकलोडियन्सतर्फे अनेक आकर्षक भेटवस्तू व शालेय अभ्यासक्रमाचे साहित्य, वह्या, पुस्तके देण्यात आली. निकलोडियन्सतर्फे भारतात पहिल्यांदाच एक आगळावेगळा प्रयत्न करण्यात येत आहे. याची सुरुवात मुंबईहून करण्यात आली व ‘लोकमत’ने ही संधी बाल विकास मंचच्या मुलांना दिली.
मुलांना या वेळी मोतू, पतलूचा एक अ‍ॅनिमेटेड चित्रपट दाखविण्यात आला. यानंतर त्यांना चित्रपटात दाखवलेल्यापैकी काही सोपे प्रश्न विचारण्यात आले. या अनोख्या खेळाला चिमुरड्यांनी भरघोस प्रतिसाद दिला.
यातून अचूक उत्तरे देण्यात आलेल्या विजेत्यांची नावे काही दिवसांनी जाहीर करण्यात येणार आहेत. ही स्पर्धा दिल्ली, कोलकाता आणि इतर महानगरांतही राबविण्यात येणार आहे. यातून निवडलेल्या विजेत्यांना मोटू, पतलूबरोबर अ‍ॅनिमेटेड चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. भारतात पहिल्यांदाच सामान्य मुलांपैकी एकाचे अ‍ॅनिमेटेड पात्र तयार होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Motu, Patulam meet meeting small friends!