'म्हणून मी भारतीय जनतेला छळतोय!' राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर व्यंगबाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 10:32 AM2019-01-19T10:32:48+5:302019-01-19T14:51:24+5:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून मोदी सरकारवर टीका केली आहे. 

mns chief takes dig PM Narendra Modi through cartoon | 'म्हणून मी भारतीय जनतेला छळतोय!' राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर व्यंगबाण

'म्हणून मी भारतीय जनतेला छळतोय!' राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर व्यंगबाण

googlenewsNext
ठळक मुद्देकाँग्रेसने मोदींना छळले, म्हणून मोदी जनतेला छळत असल्याचा टोला राज ठाकरे यांनी या व्यंगचित्रातून लगावला आहे. राज ठाकरे यांनी ट्विटरवर नरेंद्र मोदींवर निशाणा साधणारे व्यंगचित्र शेअर केले आहे.गुजरातचा मुख्यमंत्री असताना मला काँग्रेसने छळले होते, असे मोदींनी म्हटले होते. या विधानाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र रेखाटले आहे.

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून मोदी सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसने मोदींना छळले, म्हणून मोदी जनतेला छळत असल्याचा टोला राज ठाकरे यांनी या व्यंगचित्रातून लगावला आहे. राज ठाकरे यांनी ट्विटरवर नरेंद्र मोदींवर निशाणा साधणारे व्यंगचित्र शेअर केले आहे. गुजरातचा मुख्यमंत्री असताना मला काँग्रेसने छळले होते, असे मोदींनी म्हटले होते. या विधानाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र रेखाटले आहे. काँग्रेसने मला छळले, म्हणून मी जनतेला छळतो, असे या व्यंगचित्रात रेखाटण्यात आले आहे.

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत नरेंद्र मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले होते. देशाची 2004 ते 2014 ही मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातील वर्षे वाया गेली आणि भ्रष्टाचार करता यावा म्हणून अनेकांना अशक्त सरकार हवे असते, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर टीका केली होती. गुजरातचा मुख्यमंत्री असताना काँग्रेसने माझे पाय खेचण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर वाटेल ते आरोप करुन माझा छळ करण्यात आला असे मोदींनी सांगितले होते. या विधानाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र रेखाटले आहे. 


राज यांनी याआधी संक्रांतीला पंतप्रधान मोदी थापांचे पतंग उडवत असल्याचं व्यंगचित्र रेखाटलं होतं. अमित शहा, भक्त आणि काही मीडियासोबत मोदी पतंग उडवत होते. 10 टक्के सवर्ण आरक्षणाचा पतंग आकाशात उडत आहे आणि आधी दिलेल्या आश्वासनांचे पतंग गच्चीत पडले आहेत, असं व्यंगचित्र काढून राज यांनी आरक्षणाच्या निर्णयावरुन टोला लगावला होता.  

Web Title: mns chief takes dig PM Narendra Modi through cartoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.