Join us

फडणवीसांच्या जवळच्या आमदाराने उद्धव ठाकरेंना फोन केला? प्रसाद लाड यांनी सगळंच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 20:28 IST

Prasad Lad : लोकसभा निवडणुकांचे उद्या ४ जून रोजी निकाल समोर येणार आहेत. याआधी राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरू आहेत.

Prasad Lad ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांचे उद्या ४ जून रोजी निकाल समोर येणार आहेत. याआधी राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरू आहेत. काल आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत येतील असं विधान केलं होतं, तर दुसरीकडे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या आमदाराने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन संपर्क साधल्याची माहिती मिळत आहे. लोकसभा निकालानंतर ठाकरे यांच्याकडे भेटीची वेळ मागितल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आता यावर भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी स्पष्टीकरण दिले असून हे वृत्त फेटाळून लावले आहे. लाड यांनी हे वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या आमदाराने उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचे वृत्त समोर आले आहे. ठाकरे यांच्याकडे उद्या सायंकाळी ५ वाजताची वेळ मागितल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी हे वृत्त खोटं असल्याचं सांगितले आहे.

आमदार प्रसाद लाड काय म्हणाले?

प्रसाद लाड म्हणाले, मीडियामध्ये ज्या पद्धतीने पर्सेप्शन निर्माण केलं आहे की, आम्ही उद्धव ठाकरेंना फोन करुन वेळ मागितली. ही चुकीची बातमी पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. ना आम्हाला उद्धव ठाकरेंची गरज होती, ना आहे आणि ना भविष्यात कधी लागेल. निश्चितपणे कुणीतरी पर्सेप्शन करण्यासाठी ही माहिती पसरवली आहे. महाविकास आघाडीचा पराभव पूर्णपणे दिसतोय. मोदी सरकार पुन्हा येणार ते दिसत आहे. महाराष्ट्रातला महायुतीचा विजय समोर दिसायला लागलाय. त्यामुळे खोट्या बातम्या पसरवण्याचे काम चालू आहे. त्याचा मी निषेध करतो, असंही आमदार प्रसाद लाड म्हणाले. 

आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट

"उद्धव ठाकरे निकालानंतर २० दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिसतील, असा आमदार   रवी राणा यांनी केला आहे. "एक्झिट पोलचे आकडे आज आले आहेत. ज्या दिवशी निवडणुका झाल्या त्याच दिवशी आमच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता. त्यामुळे त्याच दिवशी आम्हाला निकाल माहित होता. म्हणून नवनीत राणा २ लाखांनी निवडून येणार हा आमचा दावा आहे, असंही रवी राणा म्हणाले. 

टॅग्स :प्रसाद लाडभाजपाशिवसेनाउद्धव ठाकरेलोकसभा निवडणूक २०२४