शासकीय चिन्हाचा गैरवापर करणारे गजाआड

By Admin | Updated: August 4, 2014 00:04 IST2014-08-04T00:04:11+5:302014-08-04T00:04:11+5:30

कळंबोली शिवसेना शाखा प्रमुखांना मारहाण करुन पसार होण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या ४ जणांना कळंबोली पोलिसांनी अटक केली

Misuse of government mark | शासकीय चिन्हाचा गैरवापर करणारे गजाआड

शासकीय चिन्हाचा गैरवापर करणारे गजाआड

पनवेल : कळंबोली शिवसेना शाखा प्रमुखांना मारहाण करुन पसार होण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या ४ जणांना कळंबोली पोलिसांनी अटक केली असता त्याच्याकडे बनावट शासकीय सेवेच्या चिन्हाचा गैरवापर करणारे कार्ड आढळून आले आहे. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली आहे.
कळंबोली शिवसेना शाखाप्रमुख गिरीश धुमाळ यांच्याशी कळंबोली येथील हॉटेलमध्ये या चौघांशी बाचाबाची आणि हाणामारी झाली. यावेळी त्यांनी आम्ही नॅशनल जस्टीस कौन्सिलचे काम करतो. आमचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे आहे, असे सांगून त्यांनी त्याला मारण्यास सुरुवात केली. यावेळी स्थानिकांनी तातडीने कळंबोली पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोहिते यांच्या गाडीचा पाठलाग करुन आरोपी विशाल आमळ (३६ रा. येरवडा, पुणे), विजयराज दिनकर पाटील (२५, रा. वडगाव, पुणे), किरण महेश कामत (२५, रा. अप्पर इंदिरा नगर, पुणे) व नितीन अण्णाराव कांबळे (२४, रा. प्रेमनगर वसाहत मार्केट यॉर्ड, पुणे) यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहिती मिळताच कळंबोली शिवसेना शहरप्रमुख डी. एन. मिश्रा व विभागप्रमुख भगत व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. या संदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी जिल्हाप्रमुख बबन पाटील यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Misuse of government mark