प्रत्युषाचा झाला होता गर्भपात

By Admin | Updated: April 20, 2016 05:42 IST2016-04-20T05:42:55+5:302016-04-20T05:42:55+5:30

प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्याप्रकरणाला सध्या नवे वळण येण्याची शक्यता आहे. प्रत्युषाने आत्महत्येपूर्वी गर्भपात केल्याचे रुग्णालयाच्या अहवालात स्पष्ट झाले आहे

The miscarriage had been confirmed | प्रत्युषाचा झाला होता गर्भपात

प्रत्युषाचा झाला होता गर्भपात

मुंबई : प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्याप्रकरणाला सध्या नवे वळण येण्याची शक्यता आहे. प्रत्युषाने आत्महत्येपूर्वी गर्भपात केल्याचे रुग्णालयाच्या अहवालात स्पष्ट झाले आहे. हा अहवाल चुकीचा असल्याचे राहुल राज सिंगचे म्हणणे आहे.
प्रत्युषाच्या गर्भाशयाच्या ऊतींची हिस्टोपॅथॉलॉजिकल चाचणीनंतर ही बाब समोर आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आत्महत्येच्या काही दिवस किंवा महिनाभरआधी प्रत्युषाला गर्भधारणा झाली होती. शिवाय गर्भाचा मृत्यू झाल्याचे या चाचणीतून समोर आले आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, गर्भाशयात जंतूसंसर्ग आणि जखम दिसून आली आहे, जी गर्भपात करताना झाली असावी. गर्भपात करतानाच अशा प्रकारची जखमी होऊ शकते.
दरम्यान, आम्ही अहवालातील माहिती सांगू शकणार नाही. हा अहवाल पोलिसांकडे सोपवला
आहे, असे जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The miscarriage had been confirmed