Join us  

शरद पवारांनी 'एनडीए'त येऊन मोदींसोबत काम करावं; केंद्रीय मंत्र्यांचं 'आग्रहाचं आमंत्रण'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 6:59 PM

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अनुभवाचा देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी फायदा होईल, असं रामदास आठवले यांनी सांगितले. 

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात शिवसेनेला दिलेला पाठिंबा काढून घ्यावा. तसेच शरद पवार यांनी भाजपाला पाठिंबा देऊन एनडीएत सामील व्हावे, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) व्यक्त केलं आहे.

रामदास आठवले यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादीला 'एनडीए'त सामील होण्याचं निमंत्रण दिलं आहे. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करावं. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अनुभवाचा देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी फायदा होईल, असं रामदास आठवले यांनी सांगितले. 

आम्हीच तुम्हाला सरकार पाडण्याचा मुहूर्त देऊ, पण...; संजय राऊतांनी सांगितले कारण

राज्यात भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाची महायुती तयार झाली तर ही महायुती प्रचंड शक्तीशाली असेल. त्यामुळे शरद पवार यांनी शिवसेनेला दिलेला पाठिंबा काढून घ्यावा, असं रामदास आठवले यांनी सांगितले. त्याचप्रमाणे हे माझं वैयक्तिक मत आहे, असं देखील रामदास आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

शरद पवार राज्यातील अत्यंत कर्तव्यदक्ष नेते आहेत. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर विविध प्रश्नांची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे देशाचा विकास करण्यासाठी आपण उद्योगक्षेत्रात पडलं पाहिजे, अशी भूमिका त्यांनी अनेकवेळा व्यक्त केली आहे, असं रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले.

अन्य महत्वाच्या बातम्या-

नया है वह! मंत्री झाल्याने शहाणपण येतं असं नाही; देवेंद्र फडणवीसांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

केतकी चितळेची मनसेकडून कानउघाडणी; महापुरुषांबद्दल बोलताना ताळतंत्र पाळा, नाहीतर...

"एका मुलाखतीनंतर खळबळ उडणार होती ना; कुठे काही उडलेलं तर दिसलं नाही"

टॅग्स :शरद पवाररामदास आठवलेनरेंद्र मोदीराष्ट्रवादी काँग्रेसभाजपामहाराष्ट्र सरकारउद्धव ठाकरेशिवसेना