मुंबई विद्यापीठाची कमाल, गैरहजर विद्यार्थी चक्क उत्तीर्ण; ‘सीडीओई’च्या निकालात घातला घोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 11:45 IST2026-04-29T11:45:22+5:302026-04-29T11:45:22+5:30

‘सीडीओई’च्या एम. कॉम सत्र १ च्या निकालाचा घोळ, ‘सीडीओई’मधील टी.वाय.बी.कॉम अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकाही फुटली होती

M.Com Semester 1 course exam student who was actually absent was shown as having passed by result of University of Mumbai | मुंबई विद्यापीठाची कमाल, गैरहजर विद्यार्थी चक्क उत्तीर्ण; ‘सीडीओई’च्या निकालात घातला घोळ

मुंबई विद्यापीठाची कमाल, गैरहजर विद्यार्थी चक्क उत्तीर्ण; ‘सीडीओई’च्या निकालात घातला घोळ

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) हिवाळी सत्राच्या एम. कॉम सत्र १ अभ्यासक्रमाच्या निकालात चक्क गैरहजर विद्यार्थिनीला पास दाखवले आहे. त्याचवेळी प्रत्यक्षात परीक्षा दिलेल्या अनेक विद्यार्थ्यांना गैरहजर दाखविण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या निकालातील गोंधळ पुन्हा उघडकीस आला असून, विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

आश्चर्याचा धक्का
‘सीडीओई’च्या एम.कॉम सत्र १ अभ्यासक्रमाच्या परीक्षा जानेवारी-फेब्रुवारीत झाल्या. या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत एका विद्यार्थिनीने व्यक्तिगत कारणांमुळे डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्ससेशन आणि अँडव्हान्स फायनान्सिअल अकाउंटिंग या दोन विषयांची परीक्षा दिली नव्हती. मात्र, निकालात या दोन्ही विषयांत ती पास केल्याचे दिसून आले. मला आश्चर्याचा धक्का बसल्याचे तिने सांगितले.

संचालकांना दिले निवेदन
अनेक विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित असताना विद्यापीठाने त्यांना गैरहजर दाखवून नापास केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. परीक्षा दिली असताना गैरहजर दाखविल्याने जवळपास २५ ते ३० विद्यार्थ्यांनी मंगळवारी ‘सीडीओई’चे संचालक डॉ. शिवाजी सरगर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. ­

‘विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराचा फटका’
अनेक विद्यार्थ्यांना तीन विषयांमध्ये परीक्षा देऊनही गैरहजर दाखवले होते. मला आणि आणखी दोन मित्रांना विद्यापीठाने तीन विषयांत परीक्षा दिली असताना गैरहजर दाखवले आहे. तर, प्रत्येकी एका विषयात गैरहजर दाखवले आहे. आम्ही नोकरी करून परीक्षेसाठी मोठी मेहनत घेतली आहे. मात्र, विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारामुळे निकाल चुकीच्या पद्धतीने लावण्यात आले आहेत, असे एका विद्यार्थिनीने सांगितले. 

विद्यापीठाने विद्यार्थ्यांना काही विषयांत गैरहजर दाखवले आहे. तर, काही विषयांमध्ये आम्ही उत्तरपत्रिका चांगल्या सोडविल्या असताना विद्यापीठाने अतिशय कमी गुण देऊन नापास केले आहे. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीतही अनेक चुका आहेत, असे अन्य एका विद्यार्थिनीने सांगितले. याबाबत विद्यापीठाकडे विचारणा केली असता सुधारित निकाल जाहीर केला असून तो निकाल विद्यार्थ्यांच्या लॉगिन उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

Web Title : मुंबई विश्वविद्यालय का कमाल: अनुपस्थित छात्र पास, परीक्षा परिणाम में गड़बड़ी

Web Summary : मुंबई विश्वविद्यालय के सीडीओई ने एम.कॉम परीक्षा में एक अनुपस्थित छात्र को पास घोषित कर दिया। उपस्थित कई छात्रों को अनुपस्थित बताया गया, जिससे आक्रोश है। छात्रों ने त्रुटियों का विरोध किया, मूल्यांकन में सुधार की मांग की। विश्वविद्यालय ने जल्द ही संशोधित परिणाम का वादा किया।

Web Title : Mumbai University Fiasco: Absent Student Passes, Exam Results in Disarray

Web Summary : Mumbai University's CDOE declared an absent student passed in M.Com exams. Many who appeared were marked absent, causing distress. Students protested the errors, citing poor evaluation and demanding corrections. The university promised revised results soon.