माथेरानच्या हातरिक्षांची खान्देशी मजुरांना साथ

By Admin | Updated: May 4, 2015 23:45 IST2015-05-04T23:45:12+5:302015-05-04T23:45:12+5:30

प्रदूषणविरहित जागतिक पर्यटन स्थळामध्ये जरी माथेरानची गणना होत असली तरी हेच माथेरानचे वैशिष्ट्य नव्हे, माथेरान हे जगातील

Matheran's reservoirs with the Khandwa workers | माथेरानच्या हातरिक्षांची खान्देशी मजुरांना साथ

माथेरानच्या हातरिक्षांची खान्देशी मजुरांना साथ

माथेरान : प्रदूषणविरहित जागतिक पर्यटन स्थळामध्ये जरी माथेरानची गणना होत असली तरी हेच माथेरानचे वैशिष्ट्य नव्हे, माथेरान हे जगातील एकमेव पर्यटन स्थळ आहे की ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शेती होत नाही, पर्यटन हीच येथील शेती आहे. माथेरान व येथील आजूबाजूच्या आदिवासी वाडींचे दैनंदिन व्यवहार, त्यांचा संसारच यावर अवलंबून आहे. येथे कामाच्या शोधात येणाऱ्या मेहनती हाताला रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळेच दुष्काळग्रस्त यवतमाळ, नांदेड, जळगावसारख्या ठिकाणांवरून रोजगारासाठी अनेक तरु ण येत असतात.
अंगमेहनतीची तयारी असल्याने माथेरानमध्ये त्यांना हातरिक्षा ओढण्याचे काम मिळते. या रोजगारात शरीराची पिळवणूक जरी होत असली तरी संपूर्ण कुटुंबासाठी दोन वेळचे जेवण व काटकसर करून गाठीशी दोन पैसे साठवता येण्याचा एकमेव मार्ग त्यांना सापडला आहे. माथेरानमध्ये सर्व प्रकारच्या इंधनावर चालणाऱ्या वाहनांना बंदी आहे. वयोवृद्ध नागरिकांना घोडेस्वारी शक्य नसल्याने माणसांनी खेचणाऱ्या हातरिक्षा हाच पर्याय येथे उपलब्ध आहे. पूर्वी येथील नागरिकच हा व्यवसाय करीत असत पण हातरिक्षा ओढल्याने होणारे श्वसनाचे विकार, इतकी मेहनत करूनही मिळणारे कमी उत्पन्न यामुळे येथील नवीन सुशिक्षित पिढीने या व्यवसायाकडे पाठ फिरविल्याने हात रिक्षा खेचण्यासाठी मजुरांची संख्या कमी पडू लागली. परंतु खान्देशातील तरुण माथेरानमध्ये आल्यानंतर सर्वांचीच सोय झाली. (वार्ताहर)

Web Title: Matheran's reservoirs with the Khandwa workers