परिचिताकडून विवाहितेचा खून

By Admin | Updated: May 3, 2015 23:00 IST2015-05-03T23:00:36+5:302015-05-03T23:00:36+5:30

माझ्या पत्नीला फोन करू नकोस, तिला भेट नेकोस, तिच्याशी बोलू नकोस असा दम रामनयनला पतीने दिल्याने त्याने राधिका यादव (३०) या महिलेवर

Married murderer from acquaintance | परिचिताकडून विवाहितेचा खून

परिचिताकडून विवाहितेचा खून

वाडा : माझ्या पत्नीला फोन करू नकोस, तिला भेट नेकोस, तिच्याशी बोलू नकोस असा दम रामनयनला पतीने दिल्याने त्याने राधिका यादव (३०) या महिलेवर शस्त्राने वार करून तिचा खून केल्याची घटना रविवारी सकाळी ८.१५ च्या सुमारास खुपरी गाव हद्दीत घडली.
राधिका ही एका कंपनीत कामाला होती. तिथे तिची परिसरातील रामनयन याच्याशी ओळख होती. यामुळे तो फोन करायचा. तिचा पती सिताराम याने त्याला माझ्या पत्नीला यापुढे भेटू नकोस, अशी समज दिली होती. याचा राग मनात धरून ती कामाला जात असताना त्याने तिच्यावर वार केले. वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Married murderer from acquaintance