Vidhan Sabha 2019: भाजपा-शिवसेनेचं ठरलंय; पितृपक्षात फक्त वाटाघाटी, घटस्थापनेलाच होणार युती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 11:00 IST2019-09-24T10:54:54+5:302019-09-24T11:00:21+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - आज दुपारी मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदारांची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलाविली आहे.

Vidhan Sabha 2019: भाजपा-शिवसेनेचं ठरलंय; पितृपक्षात फक्त वाटाघाटी, घटस्थापनेलाच होणार युती!
मनोहर कुंभेजकर
मुंबई - लोकसभा निवडणुकीपासून आमचं ठरलंय म्हणणारे शिवसेना-भाजपाच्या युतीचं घोडं अद्याप जागावाटपात अडलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्या आयारामांना तिकीट वाटपात कसं सामावून घेणार हा मोठा प्रश्न युतीसमोर आहे. त्यामुळे जागावाटपाचा पेच सोडविण्यासाठी युतीत चर्चेचं गुऱ्हाळ सुरु आहे. शिवसेना-भाजपाची युती कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मुंबईतील मालाड पश्चिम,भायखळा,चांदिवली यांसह राज्यातील इतर जागा शिवसेना लढविणार की, भाजपा यावर चर्चा सुरु आहे. काही जागांमध्ये अदला बदल करण्यात दोन्ही पक्षाचे एकमत झाल्याचं कळतंय. युतीच्या चर्चेचे गुऱ्हाळ येत्या शनिवारपर्यंत सुरू राहणार आहे आणि युतीची रितसर घोषणा रविवार घट स्थापनेच्या मुहुर्तावर होणार असल्याची शक्यता आहे.
आज दुपारी मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदारांची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलाविली आहे. या बैठकीबाबत बातम्या वाहिन्या व प्रसिद्धी माध्यमांनी दिल्या त्यात काही तथ्य नसून मातोश्रीवर बैठकीत युतीच्या घोषणेबाबत संयुक्त पत्रकार परिषदेचा अजेंडा नसल्याचे समजते. 1001 टक्के सन्मानाने भाजप व शिवसेनेची युती होणार असून घटस्थापनेच्या दिवशी युतीचे घट बसणार असल्याची माहिती सूत्रांनी लोकमतशी बोलतांना दिली. जप 154, शिवसेना 126 मित्रपक्ष 18 असा युतीचा फॉर्म्युला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करतील अशी खात्रीलायक माहिती आहे. युवासेनाप्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे वरळी येथून निवडणूक लढवणार असून आदित्यने सध्या भेटीगाठी व लक्ष वरळीवर केंद्रीत केले आहे. गणेशोत्सवात देखील त्यांनी येथील अनेक मंडळांना भेटी दिल्या होत्या.आदित्यसाठी येथील शिवसेनेचे विभागप्रमुख आशिष चेंबूरकर,माजी मंत्री सचिन अहिर, नगरसेवक व पदाधिकारी यांनी कंबर कसली आहे.
महत्वाच्या बातम्या
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा अखेर मुहूर्त ठरला; उदयनराजे भोसलेंना मोठा दिलासा
काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा भाजपाच्या वाटेवर?; पंतप्रधान मोदींनी मानले ट्विटवरुन आभार
'या' 12 जागांसाठी युतीची लढाई, पश्चिम महाराष्ट्रात भाजपा आग्रही
अमेरिकेत पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवादावर केला धक्कादायक खुलासा; म्हणाले...