Maharashtra Lok Sabha Election Result 2024 :महाराष्ट्राचा किंग कोण? लोकसभेचा फायनल आकडा आला समोर; कोणाचे उमेदवार जिंकले, कोणाचे आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 06:14 PM2024-06-04T18:14:21+5:302024-06-04T18:17:28+5:30

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असल्याचं दिसत आहे, तर काही ठिकाणी विजय मिळवला आहे.

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Who is the King of Maharashtra? Lok Sabha final figure is out; Whose candidate won, whose candidate is leading | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 :महाराष्ट्राचा किंग कोण? लोकसभेचा फायनल आकडा आला समोर; कोणाचे उमेदवार जिंकले, कोणाचे आघाडीवर

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 :महाराष्ट्राचा किंग कोण? लोकसभेचा फायनल आकडा आला समोर; कोणाचे उमेदवार जिंकले, कोणाचे आघाडीवर

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. राज्यात एक्झिट पोलने वर्तवलेल्या अंदाजाच्या उलट निकाल लागल्याचे समोर आले आहे. राज्यात महाविकास आघाडीला जास्त जागा मिळत असल्याचे दिसत आहे, देशातही चुरशीने लढत झाली आहे. बारामती, सांगली, सातारा, सोलापूर या मतदारसंघावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. दरम्यान, आता या मतदारसंघाचे निकाल समोर आले आहेत. 

Baramati Lok Sabha Result 2024:अजित पवारांची बंडखोरी बारामतीकरांना नाही रुचली; सुनेत्रा पवार १ लाखांच्या फरकाने पराभूत

राज्यात लोकसभेचे धक्कादायक निकाल समोर आले आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उदयनराजे भोसले यांचा मोठ्या फरकाने विजय झाला आहे. मतमोजमीच्या सुरुवातीला वाई मतदार संघातून शशिकांत शिंदे यांना मताधिक्य मिळाले. कोरेगाव त्याबरोबरच सातारा तालुकाही शशिकांत शिंदे यांना सुरुवातीला चांगली आघाडी मिळाली. त्यानंतर, या ठिकाणी उदयनराजे भोसले यांनी आघाडी घेतली आणि कोरेगावात सुमारे पाच हजार, तर सातारा लोकसभा मतदारसंघात सुमारे २९ हजारांनी मताधिक्य मिळविले. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी विजय मिळविला. 

बारामती लोकसभा मतदारसंघात मोठ्या फरकाने विजय

अजित पवारांनी बंडखोरी केल्यानंतर बारामतीत कोणाचं वर्चस्व येणार याकडे देशाचे लक्ष लागले होते. अखेर निवडणुकीत शरद पवारांनी दाखवून दिले कि बारामती ही आमचीच आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) १ लाखांहून अधिक मताने निवडून आल्या आहेत.  

महाविकास आघाडी ३० जागांवर आघाडी

राज्यात महाविकास आघाडी २९ जागांवर आघाडी घेतली आहे. यात काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर आहे, तर शिवसेना (ठाकरे गट) १० जागा, राष्ट्रवादी (शरद पवार गट) ७ जागांवर आघाडी आहेत. महाविकास आघाडीच राज्यात मोठी आघाडी असल्याचं दिसत आहे. 

महायुतीच्या किती जागा?

राज्यात महायुती लोकसभा निवडणुकीत मागे पडल्याचे दिसत आहे. भाजपाने ११ जागांवर आघाडी घेतली आहे, तर शिवसेना (शिंदे गट) ६ जागांवर आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला रायगडची एक जागा मिळाली आहे. राज्यात महायुतीच्या १८ जागा आघाडीवर आहेत. 

Web Title: Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Who is the King of Maharashtra? Lok Sabha final figure is out; Whose candidate won, whose candidate is leading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.