काँग्रेसनं 'या' २ जागांवर केले उमेदवार घोषित; रावसाहेब दानवेंविरोधात कोण लढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 09:07 PM2024-04-10T21:07:54+5:302024-04-10T21:10:27+5:30

धुळे लोकसभा आणि जालना लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने उमेदवारांची घोषणा केली आहे.

lok sabha election 2024 Congress has declared candidates on jalna and dhule seats Who will fight against Raosaheb Demon? | काँग्रेसनं 'या' २ जागांवर केले उमेदवार घोषित; रावसाहेब दानवेंविरोधात कोण लढणार?

काँग्रेसनं 'या' २ जागांवर केले उमेदवार घोषित; रावसाहेब दानवेंविरोधात कोण लढणार?

महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसापासून जागावाटपासाठी बैठका सुरू होत्या,  महाविकास आघाडीत अखेर जागावाटपाचा तिढा सुटला आहे. गुढी पाडव्यादिवशी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. दरम्यान, आता काँग्रेसने आज दोन जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे.

...तर संविधान पूर्ण देशात लागू करण्याची हिंमत का केली नाही?; PM नरेंद्र मोदी कडाडले

काँग्रेसने दोन जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. धुळे लोकसभा आणि जालना लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपाच्या रावसाहेब  दानवे यांच्याविरोधात काँग्रेसने डॉ.कल्याण काळे यांना मैदानात उतरवले आहे. 

तर धुळे लोकसभा मतदारसंघासाठी डॉ. शोभा बच्छाव यांच्या नावाची घोषणा काँग्रेसने केली आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला १७ जागा देण्यात आल्या आहेत. 

मविआकडून जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा २१-१७-१० असा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती दिली. तसंच कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवणार याबाबतची माहिती दिली.

महाविकास आघाडीचं असं असेल जागावाटप: 

नंदुरबार, धुळे, नांदेड, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई, मुंबई उत्तर पूर्व अशा एकूण १७ जागांवर काँग्रेस निवडणूक लढणार आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष १० जागा लढणार असून यामध्ये बारामती, शिरूर, सातारा, माढा, अहमदनगर दक्षिण, रावेर, भिवंडी,  बीड, वर्धा, दिंडोरी या मतदारसंघांचा समावेश आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे २१ जागा लढणार असून यामध्ये जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशीव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य या मतदारसंघांचा समावेश आहे. 

Web Title: lok sabha election 2024 Congress has declared candidates on jalna and dhule seats Who will fight against Raosaheb Demon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.