लिफ्ट कोसळून १ ठार, ४ जखमी गिरगाव येथील घटना

By Admin | Updated: September 26, 2015 03:09 IST2015-09-26T03:09:23+5:302015-09-26T03:09:23+5:30

गिरगाव येथे बांधकामधीन इमारतीची लिफ्ट कोसळून १ ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली

Lift collapses in 1 killed, 4 injured Girgaon incident | लिफ्ट कोसळून १ ठार, ४ जखमी गिरगाव येथील घटना

लिफ्ट कोसळून १ ठार, ४ जखमी गिरगाव येथील घटना

मुंबई : गिरगाव येथे बांधकामधीन इमारतीची लिफ्ट कोसळून १ ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी जयंती ग्रुपचे मालक आणि सुपरवायझर यांच्याविरुद्ध वी.पी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अधिक तपास सुरु आहे.
राजू प्रजापती (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर ऋषिकेश ढंगळे (२२), संतोष कदम (३५), भोला (२३), राजन छोटालाल जयस्वाल (२३) अशी जखमी तरुणांची नावे आहेत. नायर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गिरगाव येथील सदाशिव लेन परिसरात जयंती ग्रुपच्या सुरु असलेल्या इमारत बांधकामाच्या ठिकाणी ते काम करत होते. मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास सुरक्षेची काळजी न घेता लिफ्टचे काम करत असताना ते लिफ्टसह खाली कोसळले. यामध्ये प्रजापती लिफ्टखाली चिरडला गेला तर इतर चौघे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच दाखल झालेल्या वी.पी. रोड पोलिसांनी जखमींना जवळच्या नायर रुग्णालयात दाखल केले. यामध्ये दाखल करण्यापूर्वीच प्रजापतीला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी जयंती ग्रुपच्या मालक आणि सुपरवायझरविरुद्ध भादंवी कलम ३०४ अ,३३७ आणि ३३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती वी.पी. रोड पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Lift collapses in 1 killed, 4 injured Girgaon incident