तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी

By Admin | Updated: September 2, 2015 02:53 IST2015-09-02T02:53:03+5:302015-09-02T02:53:03+5:30

शीना बोरा हत्याकांडाच्या तपासात हलगर्जी केल्याचा ठपका रायगड पोलिसांवर ठेवण्यात आल्याने तत्कालीन अधिकाऱ्यांची चौकशी मंगळवारी रायगडचे पोलीस

The investigation of the then police officers | तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी

तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी

अलिबाग : शीना बोरा हत्याकांडाच्या तपासात हलगर्जी केल्याचा ठपका रायगड पोलिसांवर ठेवण्यात आल्याने तत्कालीन अधिकाऱ्यांची चौकशी मंगळवारी रायगडचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी आपल्या कार्यालयात केली. रात्री उशिरापर्यंत ही चौकशी सुरू होती.
पेणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश मिरघे, तत्कालीन पोलीस उप अधीक्षक प्रदीप चव्हाण आणि पोलीस पाटील गणेश ढोणे यांचा चौकशीमध्ये समावेश होता. पोलीस उपनिरीक्षक संदीप धांडे हे मंगळवारी चौकशीसाठी आले नसल्याचे पोलीससूत्रांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक सुरेश मिरघे यांची दुपारी १२ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत चौकशी करण्यात आली. त्यांची चौकशी पूर्ण झाल्यावर ते पोलीस अधीक्षक कार्यालयातून बाहेर पडले. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. तत्कालीन पोलीस उप अधीक्षक प्रदीप चव्हाण आणि पोलीस पाटील गणेश ढोणे यांची मंगळवारी उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. चव्हाण यांना सोमवारीही चौकशीला बोलावण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The investigation of the then police officers