सेव्हन हिल्स रुग्णालयात खाटांच्या संख्येत वाढ; रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासनाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 06:41 AM2020-09-18T06:41:34+5:302020-09-18T06:42:05+5:30

कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढल्यास पूर्वतयारी असावी, या दृष्टीने जम्बो सेंटरमध्ये २५० आयसीयू खाटांची उपलब्धता असल्याची माहिती समोर येत आहे.

An increase in the number of beds at Seven Hills Hospital; The decision of the administration due to the increase in the number of patients | सेव्हन हिल्स रुग्णालयात खाटांच्या संख्येत वाढ; रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासनाचा निर्णय

सेव्हन हिल्स रुग्णालयात खाटांच्या संख्येत वाढ; रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासनाचा निर्णय

Next

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून मुंबईत पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे महापालिकेने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. सध्या असलेल्या २०० खाटांमध्ये अजून १०० खाटांची भर पडणार आहे. त्यातील २० खाटा बुधवारी वाढवण्यात आल्या, पुढील खाटा टप्प्याटप्याने वाढवण्यात येणार आहेत.
कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढल्यास पूर्वतयारी असावी, या दृष्टीने जम्बो सेंटरमध्ये २५० आयसीयू खाटांची उपलब्धता असल्याची माहिती समोर येत आहे. गोरेगाव येथील नेस्को केंद्रासह महालक्ष्मी येथील जम्बो केंद्रातही खाटांची संख्या टप्प्याटप्याने वाढवण्यात येणार आहे. सध्या विविध केंद्रामध्ये खाटांची उपलब्ध क्षमता १७ हजार ४२६ इतकी आहे.
त्यातील ११ हजार ५०६ खाटा रुग्णसेवेसाठी देण्यात आलेल्या आहेत, तर पाच हजार ९२० खाटा उपलब्ध आहेत.
अतिदक्षता खाटांसाठी उपलब्धता ही १ हजार ७३२ असून त्यापैकी १४१ खाटा रिकाम्या आहेत. आॅक्सिजनची उपलब्धता असलेल्या खाटांची क्षमता ही ८ हजार ८३७ असून, सध्या उपलब्धता ३ हजार ७८ खाटांची आहे.
तर व्हेंटिलटर असलेल्या एक हजार १०२ खाटांपैकी केवळ ६७ खाटा रिकाम्या असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून आले आहे. सेव्हन हिल्स रुग्णालयात ९ हजार ४४७ रुग्णांना उपचार देण्यात आले आहेत. कोरोनापश्चात व्याधी दिसत असलेल्या रुग्णांसाठी पोस्ट कोविड ओपीडीही सुरू करण्यात आली आहे. त्यात बुधवारी आणि शनिवारी १० ते १२ व्यक्ती उपचारासाठी येतात, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता
डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी दिली.

Web Title: An increase in the number of beds at Seven Hills Hospital; The decision of the administration due to the increase in the number of patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.