कोविड संदर्भात १.१३ लाख गुन्हे दाखल, 3 कोटी ८२ लाखांचा दंड वसुल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 09:12 PM2020-05-10T21:12:30+5:302020-05-10T21:13:40+5:30

विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ८२लाख २७ हजार ७९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे

Home Minister Anil Deshmukh files 1.13 lakh cases against Kovid so far MMG | कोविड संदर्भात १.१३ लाख गुन्हे दाखल, 3 कोटी ८२ लाखांचा दंड वसुल

कोविड संदर्भात १.१३ लाख गुन्हे दाखल, 3 कोटी ८२ लाखांचा दंड वसुल

Next

मुंबई - राज्यात लाँक डाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील १ लाख 1316 गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २०० घटना घडल्या. त्यात ७३२ व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. राज्यात २२ मार्च ते ९ मे या कालावधीत  कलम १८८ नुसार १,०१,३१६ गुन्हे नोंद झाले असून १९,५१३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ८२लाख २७ हजार ७९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे अशा ६६० व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण २,५५,२६६ व्यक्ती Quarantine  आहेत. अशी माहिती देशमुख यांनी दिली.

तसेच अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत पोलीस विभागामार्फत ३,९८,३३८ पास देण्यात आले आहेत.या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १२९१ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ५५,६५० वाहने जप्त करण्यात आली . तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत. 

पोलिसांसाठी कोरोना विशेष कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील ४, पुणे १, व सोलापूर शहर १, नाशिक ग्रामीण१ अशा ७ पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. राज्यात ७५ पोलीस अधिकारी व ६२८ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार  सुरू आहेत.पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

Web Title: Home Minister Anil Deshmukh files 1.13 lakh cases against Kovid so far MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.