गुजरात, महाराष्ट्र व गोव्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 05:33 PM2020-08-19T17:33:50+5:302020-08-19T17:34:20+5:30

कमी दाबाचे क्षेत्र

Heavy rains forecast in Gujarat, Maharashtra and Goa | गुजरात, महाराष्ट्र व गोव्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज

गुजरात, महाराष्ट्र व गोव्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज

googlenewsNext

 

मुंबई : उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र असून २४ तासांत हे अधिक तीव्र होण्याची व पुढच्या ३-४ दिवसांत पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या ४-५ दिवसांत गुजरात, महाराष्ट्र व गोवा सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

बुधवारी सकाळी साडे आठ वाजता मुंबईत कुलाबा आणि सांताक्रूझ येथे अनुक्रमे १३, ११.५ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद झाली आहे. सकाळी किंचित कोसळलेल्या पावसाने नंतर मात्र दिवसभर विश्रांती घेतली. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे ऊन्हाचा पत्ता नव्हता. मात्र बुधवारी दुपारी शहर आणि उपनगरात ब-यापैकी ऊनं पडले होते. तरिही ठिकठिकाणी पडझड सुरु च होती. ४ ठिकाणी घरांचा भाग पडला. ८ ठिकाणी झाडे पडली. ७ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.

......................

शहर १६.७३
पूर्व उपनगर २४.२१
पश्चिम उपनगर १९.४४

......................

Web Title: Heavy rains forecast in Gujarat, Maharashtra and Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.