अश्लील चाळे करणारा मुख्याध्यापक फरार

By Admin | Updated: February 27, 2015 22:30 IST2015-02-27T22:30:12+5:302015-02-27T22:30:12+5:30

पाचव्या इयत्तेतील विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहे.

Headmaster absconding | अश्लील चाळे करणारा मुख्याध्यापक फरार

अश्लील चाळे करणारा मुख्याध्यापक फरार

महाड : पाचव्या इयत्तेतील विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहे.
तालुक्यातील गांधारपाले येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घडलेल्या या घृणास्पद प्रकाराबद्दल सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. संभा तितरे (५८, रा. महाड) असे मुख्याध्यापकाचे नाव असून तो गेल्या काही दिवसांपासून शाळेच्या दुपारच्या सुट्टीत पाचवी इयत्तेतील विद्यार्थिनींना आपल्या कार्यालयात बोलावून त्यांच्याशी अश्लील वर्तन करायचा. याबाबत कुणाला काही सांगितल्यास तो त्या विद्यार्थिनींना धमकावत असे. मुख्याध्यापक तितरे हा दोन महिन्यांनंतर सेवानिवृत्त होणार असल्याने तो रजेवर गेला होता. त्यानंतर शाळेतील शिक्षकांना या पीडित विद्यार्थिनींनी या प्रकाराबाबत माहिती सांगितली.
या विद्यार्थिनींच्या पालकांसह ग्रामस्थांनी गुरुवारी शाळेत जाऊन आपला संताप व्यक्त केला. गेल्या दहा दिवसांपूर्वी याबाबत केंद्रप्रमुखांनी गटशिक्षण अधिकारी सुधीर महामुनी यांच्याकडे तक्रार करूनही त्यांच्याकडून या प्रकरणी कुठलीही कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी गट शिक्षण अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तितरेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Headmaster absconding