गटाराचा स्लॅब कोसळला

By Admin | Updated: June 16, 2015 01:05 IST2015-06-16T01:05:14+5:302015-06-16T01:05:14+5:30

सानपाडामध्ये काही दिवसांपूर्वी पदपथ व गटार दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. रविवारी रात्री गटारावरील स्लॅब कोसळला.

Graft slab collapsed | गटाराचा स्लॅब कोसळला

गटाराचा स्लॅब कोसळला

नवी मुंबई : सानपाडामध्ये काही दिवसांपूर्वी पदपथ व गटार दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. रविवारी रात्री गटारावरील स्लॅब कोसळला. निकृष्ट कामामुळे ही घटना घडली असल्याची शक्यता वर्तविली जात असून कामाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
येथील सेक्टर २ परिसरामध्ये महापालिकेने एक महिन्यापूर्वीच गटार दुरुस्तीचे काम केले होते. कामाचा दर्जा चांगला नसल्यामुळे रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास स्लॅब कोसळला. यामुळे जवळपास दहा फूट मोठा खड्डा तयार झाला आहे. सुदैवाने त्यावेळी पादचारी येथून जात नव्हते. पहिल्याच पावसामध्ये महापालिकेच्या कामाची पोलखोल झाली आहे. सदर कामाची पाहणी करण्यात यावी. ठेकेदाराने निकृष्ट काम केले असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Graft slab collapsed