"The government will not fall by predicting like a parrot," said NCP minister Nawab Malik to Narayan Rane | "पोपटासारखं भविष्य सांगितल्याने सरकार पडणार नाही," महाविकास आघाडीतील मंत्र्याचा नारायण राणेंना टोला

"पोपटासारखं भविष्य सांगितल्याने सरकार पडणार नाही," महाविकास आघाडीतील मंत्र्याचा नारायण राणेंना टोला

ठळक मुद्देनारायण राणे हे भविष्य सांगणाऱ्या पक्षात गेले आहेतते पोपटासारखं भविष्य सांगत आहेतअशा पोपटासारख्या चिठ्ठ्या काढून भविष्य सांगितल्याने सरकार पडत नाही

मुंबई - राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांमध्ये एकमत नाही त्यामुळे हे सरकार सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत कोसळणार असल्याचे भाकित भाजपा नेते नारायण राणे यांनी आज केले होते. दरम्यान, या भाकितावरून राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी राणेंना जोरदार टोला लगावला आहे. पोपटासारखी भविष्यवाणी केल्याने सरकार पडणार नाही अशी बोचरी टीका मलिक यांनी केली आहे.

नारायण राणे यांनी केलेल्या भाकितावर प्रतिक्रिया देताना नवाब मलिक म्हणाले की, नारायण राणे हे भविष्य सांगणाऱ्या पक्षात गेले आहेत. त्यामुळे ते पोपटासारखं भविष्य सांगत आहेत. मात्र अशा पोपटासारख्या चिठ्ठ्या काढून भविष्य सांगितल्याने सरकार पडत नाही. तो नंबर गेम असतो, असा टोला मलिक यांनी लगावला.

दरम्यान, महाविकास आघाडीत एकमत नाही, तिन्ही पक्षांच्या भूमिका वेगळ्या आहेत त्यामुळे सरकार चालताना दिसत नाही, सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत हे सरकार राहील असा पुनरुच्चार राणेंनी केला होता. तसेच सुशांत सिंग प्रकरण आणि कर्नाटकातील शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा वाद यावरुन नारायण राणे यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता.

देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात खूप काम आहे, आम्ही मोकळे आहोत, कधी कर्नाटकात येताय, मी येतो असं संजय राऊतांना त्यांनी आव्हान दिले. संजय राऊतांना मी नेता मानत नाही, मी जाईन त्यांनी यावं असा टोला त्यांनी संजय राऊतांना लगावला होता. तसेच सुशांत सिंग प्रकरणाला कलाटणी देण्यासाठी शिवसैनिक आंदोलन करत आहे लोकांचे लक्ष मुख्य विषयाकडून वळवायचं त्यासाठी हा वाद पेटवला जात आहे. मात्र सुशांतचा खून की आत्महत्या याचा तपास सुरु आहे असं विधान नारायण राणे यांनी केले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: "The government will not fall by predicting like a parrot," said NCP minister Nawab Malik to Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.