तरुणीचा विनयभंग करुन मारहाण

By Admin | Updated: March 10, 2015 00:22 IST2015-03-10T00:22:05+5:302015-03-10T00:22:05+5:30

कळव्यातील एका १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग करुन तिला मारहाण केल्याचा प्रकार ६ मार्च रोजी घडला. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात एका

The girl was molested and beaten | तरुणीचा विनयभंग करुन मारहाण

तरुणीचा विनयभंग करुन मारहाण

ठाणे : कळव्यातील एका १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग करुन तिला मारहाण केल्याचा प्रकार ६ मार्च रोजी घडला. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपाळनगर भागात राहणाऱ्या या पिडीत मुलीला एक महिन्यांपूर्वी सचिन जाधव याने ‘तू मला आवडतेस, असे म्हणून हात पकडून तिचा विनयभंग केला. याचा तिच्या आईने त्याला जाब विचारल्यानंतर त्याने वाद घातला. त्याच भांडणाचा राग मनात धरून सचिन जाधव, ललीता जाधव, चंद्रकांत जाधव आणि त्याचा भाऊ बाबू यांनी आपसात संगनमत करुन तिच्यासह आईलाही शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यांचे भांडण सोडविणाऱ्या मल्लमा कावळे आणि पुष्पा चव्हाण यांनाही शिवीगाळ केली. तसेच पुष्पा यांच्या डोळयाजवळ वीट मारुन जखमी केले.

Web Title: The girl was molested and beaten