धारावीत चार रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:06 IST2021-09-19T04:06:23+5:302021-09-19T04:06:23+5:30

मुंबई : धारावीत शनिवारी कोरोनाचे चार रुग्ण आढळून आले आहेत, तर दादर येथे दोन आणि माहीम येथे कोरोनाचे सहा ...

Four patients in Dharavi | धारावीत चार रुग्ण

धारावीत चार रुग्ण

मुंबई : धारावीत शनिवारी कोरोनाचे चार रुग्ण आढळून आले आहेत, तर दादर येथे दोन आणि माहीम येथे कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आले. दिवसभरात या विभागात एकूण कोरोनाचे बारा रुग्ण आढळून आले.

-------------------

जयंती साजरी

मुंबई : महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट संचलित छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. ट्रस्टचे संस्थापक बाबूराव माने, खजिनदार प्रमोद माने, सचिव दिलीप शिंदे, मुख्याध्यापिका वीणा दोणवलकर, स्वाती होलमुखे, प्रा. कमलेश सोनपसरे, माधुरी घार्गे, विश्वास निमसे उपस्थित होते.

-------------------

चित्राकृतींचे प्रदर्शन

मुंबई : देशभरातील नामवंत अशा ८ चित्रकारांनी एकत्रितपणे सादर केलेल्या त्यांच्या निवडक अशा वैशिष्ट्यपूर्ण चित्राकृतींचे प्रदर्शन मुंबईत वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत रोज ११ ते ७ या वेळेत पाहायला मिळणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे.

Web Title: Four patients in Dharavi