नवी मुंबई विमानतळासाठी चारही कंपन्या पात्र

By Admin | Updated: June 19, 2015 01:42 IST2015-06-19T01:42:11+5:302015-06-19T01:42:11+5:30

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी सिडकोला प्राप्त झालेल्या चारही कंपन्या तांत्रिक व आर्थिक निविदेसाठी पात्र ठरल्या आहेत.

Four companies eligible for Navi Mumbai airport | नवी मुंबई विमानतळासाठी चारही कंपन्या पात्र

नवी मुंबई विमानतळासाठी चारही कंपन्या पात्र

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी सिडकोला प्राप्त झालेल्या चारही कंपन्या तांत्रिक व आर्थिक निविदेसाठी पात्र ठरल्या आहेत. पर्यवेक्षण आणि कार्यान्वयन समितीच्या आज झालेल्या बैठकीत ही घोषणा झाली.
विमानतळ प्रकल्पासाठी सिडकोने ५ फेब्रुवारी २०१४ रोजी जागतिक निविदेद्वारे पात्रता विनंती प्रस्तावासाठी अर्ज मागविण्यात
आले होते. अंतिम मुदतीच्या आत सिडकोला जीएमआर एअरपोर्ट लिमिटेड, झुरीच एअरपोर्ट आणि हिरानंदानी ग्रुप, मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि एमआयए इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपन्यांचे अर्ज प्राप्त झाले होते.
पात्र ठरलेल्या या कंपन्यांकडून तांत्रिक निविदा मागण्यात
येणार आहेत. त्यातील पात्र
ठरणाऱ्या एका कंपनीची विमानतळ प्रकल्पाच्या उभारणीसाठी निवड केली जाणार आहे. या बैठकीला केंद्र आणि राज्य शासनातील ज्येष्ठ
सनदी अधिकारी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया व इतर अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Four companies eligible for Navi Mumbai airport