गोवंडी परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग; अनेक झोपड्या जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 10:02 AM2024-02-17T10:02:27+5:302024-02-17T10:02:51+5:30

शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास काही झोपड्यांना अचानक आग लागली.

Fire broke out in the early hours of 17th February, in a slum in Adarsh Nagar located in the Govandi area of Mumbai, Maharashtra | गोवंडी परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग; अनेक झोपड्या जळून खाक

गोवंडी परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग; अनेक झोपड्या जळून खाक

मुंबई :  मुंबईतील गोवंडी-शिवाजी नगर आणि आदर्श नगर परिसरातील झोपडपट्टीला शनिवारी (दि.१७) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीचा क्षणार्धात आगीचा भडका उडल्याने संपूर्ण झोपडपट्टीला विळखा पडला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. 

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास काही झोपड्यांना अचानक आग लागली. आग लागल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. अनेकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, क्षणार्धात आगीचा भडका उडल्याने संपूर्ण झोपडपट्टीला विळखा पडला. त्यामुळे नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी मोकळ्या जागेत धाव घेतली. 

दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तसेच, सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, परिसरातील अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. यामुळे स्थानिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत.

Web Title: Fire broke out in the early hours of 17th February, in a slum in Adarsh Nagar located in the Govandi area of Mumbai, Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.