विनोद तावडे यांना पितृशोक

By Admin | Updated: November 23, 2015 02:21 IST2015-11-23T02:21:44+5:302015-11-23T02:21:44+5:30

राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे वडील श्रीधर रामचंद्र तावडे यांचे रविवारी सकाळी विलेपार्ले येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

Father father of Vinod Tawde | विनोद तावडे यांना पितृशोक

विनोद तावडे यांना पितृशोक

मुंबई : राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे वडील श्रीधर रामचंद्र तावडे यांचे रविवारी सकाळी विलेपार्ले येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. श्रीधर तावडे यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी विजया, तीन मुले, मुलगी, तसेच जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मूळचे कोकणातील असलेल्या श्रीधर तावडे यांनी मुंबईत आल्यानंतर म्हाडामध्ये नोकरी केली. त्यांच्या पार्थिवावर अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्याचे मंत्री, राज्यमंत्री, तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

Web Title: Father father of Vinod Tawde