Video: इमॅन्युएल मॅक्रॉन मध्य रात्री CSMT रेल्वे स्टेशनवर पोहोचले; फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मुंबईत एवढे बिनधास्त कसे फिरले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 10:36 IST2026-02-18T10:34:06+5:302026-02-18T10:36:20+5:30

Emmanuel Macron visited CSMT station : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मध्यरात्री मुंबईच्या CSMT स्टेशनला का भेट दिली.

Emmanuel Macron reached CSMT railway station at midnight; How did the French President move around Mumbai so effortlessly? | Video: इमॅन्युएल मॅक्रॉन मध्य रात्री CSMT रेल्वे स्टेशनवर पोहोचले; फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मुंबईत एवढे बिनधास्त कसे फिरले?

Video: इमॅन्युएल मॅक्रॉन मध्य रात्री CSMT रेल्वे स्टेशनवर पोहोचले; फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मुंबईत एवढे बिनधास्त कसे फिरले?

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सध्या भारत दौऱ्यावर असून त्यांच्या मुंबई भेटीतील काही खास क्षण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. एका बाजूला बॉलीवूड सेलिब्रिटींसोबतची भेट आणि दुसरीकडे सर्वसामान्य मुंबईकराप्रमाणे रस्त्यावर धावणारे मॅक्रॉन पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण, मध्यरात्री त्यांनी मुंबईचे ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गाठले, त्यामागे एक विशेष कारण होते.


'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ते हाफ पँट, टी-शर्ट आणि काळा चष्मा लावून मुंबईच्या रस्त्यांवर धावताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे सुरक्षा रक्षकही होते. कोणतीही मोठी सुरक्षा व्यवस्था न मिरवता, एका सामान्य पर्यटकाप्रमाणे त्यांनी मुंबईच्या वातावरणाचा आनंद घेतला.

दिवसभराच्या अधिकृत बैठका आणि बॉलीवूड स्टार्ससोबतची चर्चा आटोपल्यानंतर मॅक्रॉन यांनी रात्री उशिरा आपली पत्नी ब्रिगिट मॅक्रॉन यांच्यासह CSMT स्टेशनला भेट दिली. हे स्टेशन केवळ एक रेल्वे टर्मिनल नसून 'युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट' आहे.

भेटीचे नेमके कारण काय?
मॅक्रॉन यांना वास्तुकलेची विशेष आवड आहे. CSMT स्टेशन हे 'व्हिक्टोरियन गोथिक रिव्हायव्हल' आणि भारतीय पारंपारिक वास्तुकलेचा एक अद्भूत संगम आहे. ब्रिटीश आर्किटेक्ट एफ. डब्ल्यू. स्टिव्हन्स यांनी डिझाइन केलेली ही इमारत पॅरिस किंवा बार्सिलोनासारख्या 'गोथिक शहरां'ची आठवण करून देते. मॅक्रॉन यांनी स्टेशनमधील बारीक नक्काशी, घुमट आणि तिथल्या दुकानांची बारकाईने पाहणी केली. भारतीय कारागिरांनी ब्रिटीश शैलीत मिसळलेली भारतीय कला त्यांना जवळून अनुभवायची होती.

या भेटीपूर्वी त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गजांचीही भेट घेतली, ज्याचे फोटो त्यांनी स्वतः सोशल मीडियावर शेअर करत "संस्कृती आपल्याला एकत्र आणते," असे कॅप्शन दिले आहे.

Web Title : मैक्रॉन की आधी रात की मुंबई यात्रा: सीएसएमटी और भारतीय संस्कृति की खोज।

Web Summary : भारत दौरे पर आए फ्रांसीसी राष्ट्रपति मैक्रॉन ने देर रात सीएसएमटी स्टेशन का दौरा कर मुंबई को चौंका दिया। उन्होंने यूनेस्को साइट की वास्तुकला का पता लगाया, ब्रिटिश और भारतीय शिल्प कौशल के मिश्रण में गहरी रुचि दिखाई। इससे पहले, उन्होंने बॉलीवुड सितारों से मुलाकात की, सांस्कृतिक एकता का जश्न मनाया।

Web Title : Macron's midnight Mumbai visit: Exploring CSMT and Indian culture.

Web Summary : French President Macron, on an India visit, surprised Mumbai with a late-night CSMT station visit. He explored the UNESCO site's architecture, showcasing a keen interest in the blend of British and Indian craftsmanship. Earlier, he met Bollywood stars, celebrating cultural unity.