एकनाथ शिंदे, सवरा अध्यक्ष

By Admin | Updated: January 8, 2015 22:38 IST2015-01-08T22:38:38+5:302015-01-08T22:38:38+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पालकमंत्र्यांपाठोपाठ राज्यातील ३६ जिल्हा नियोजन समित्यांच्या अध्यक्षांच्या नावांची घोषणा केली आहे़

Eknath Shinde, Sawara Chauhan | एकनाथ शिंदे, सवरा अध्यक्ष

एकनाथ शिंदे, सवरा अध्यक्ष

नारायण जाधव - ठाणे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पालकमंत्र्यांपाठोपाठ राज्यातील ३६ जिल्हा नियोजन समित्यांच्या अध्यक्षांच्या नावांची घोषणा केली आहे़ राज्यात सत्ता येताच फडणवीस यांनी जिल्हा नियोजन समित्या बरखास्त केल्या होत्या़ त्यात ठाणे-पालघर जिल्ह्यांचाही समावेश होता़ त्यात जिल्हा विभाजनामुळे या दोन्ही जिल्ह्यांचे नियोजन समित्यांचे कामकाज ठप्प पडले होते़ यामुळे आर्थिक वर्षातील निधी खर्च कसा करायचा, याचे आव्हान सदस्य सचिव या नात्याने येथील जिल्हाधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान होते़ मात्र, आता जिल्हा नियोजन समिती अध्यक्षांच्या नियुक्तीमुळे हा निधी खर्च करण्याचा त्यांचा मार्ग सुकर झाला आहे़
पालकमंत्री हाच जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष असतो़ मात्र, तरीही नियोजन विभागाने त्याच्या नावाची अधिकृत घोषणा करायची असते़ त्यानुसार, नियोजन विभागाने ठाण्याचे पालकमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांची ठाणे जिल्हा नियोजन समितीवर, तर पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा यांची पालघर जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून घोषणा केली आहे़ यामुळे हे दोन्ही मंत्री आता रीतसर नियोजन समितीच्या बैठकीस हजर राहून निर्णय घेऊ शकतात़
जिल्हा विभाजनामुळे दोन्ही जिल्ह्यांच्या नियोजन समित्या बरखास्त होत्या़ त्यामुळे प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी हेच कामकाज पाहत होते़ मात्र, लोकप्रतिनिधीच नसल्याने भविष्यात बालंट येऊ नये म्हणून तातडीची कामेवगळता इतर कामे करण्यास ते धजावत नव्हते़ परंतु, आता अध्यक्ष मिळाल्याने त्यांची अडचण दूर झाली आहे़ शिवाय, गेल्याच आठवड्यात नियोजन विभागाने या समितीवर नेमण्यात येणाऱ्या इतर सदस्यांच्या नावांची यादी पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार पाठविण्याचे निर्देश दिले आहेत़ त्यामुळे महानगरातील सदस्यांच्या नावांची लवकरच घोषणा होऊ शकणार आह़े जि.प. आणि पं.स़ निवडणुकांनंतर त्यांचे सदस्य २८ जानेवारीच्या निवडणुकीनंतर नियोजन समितीवर येऊ शकतील़

४अध्यक्ष मिळाल्याने त्यांची अडचण दूर झाली आहे़
४दोन्ही मंत्री आता रीतसर नियोजन समितीच्या बैठकीस हजर राहून निर्णय घेऊ शकतात़
४निवडणूकांनंतर अन्य सदस्यांच्या होणार नियुक्त्या

Web Title: Eknath Shinde, Sawara Chauhan