चालकाचे प्रसंगावधान; वाचले प्रवाशांचे प्राण

By Admin | Updated: March 13, 2015 22:44 IST2015-03-13T22:44:54+5:302015-03-13T22:44:54+5:30

पुण्याहून रात्री उशिरा भोरमार्गे महाडकडे येणाऱ्या पुणे-खेड बसच्या चालकाच्या प्रसंगावधानामुळे पन्नास प्रवाशांचे प्राण वाचले. गुरुवारी मध्यरात्री २ वा

Driver's conduction; The passengers of the passenger read | चालकाचे प्रसंगावधान; वाचले प्रवाशांचे प्राण

चालकाचे प्रसंगावधान; वाचले प्रवाशांचे प्राण

महाड : पुण्याहून रात्री उशिरा भोरमार्गे महाडकडे येणा-या पुणे-खेड बसच्या चालकाच्या प्रसंगावधानामुळे पन्नास प्रवाशांचे प्राण वाचले. गुरुवारी मध्यरात्री २ वा. वाघाजाई घाटात घडलेल्या या प्रकारानंतर बस दरीत कोसळता कोसळता वाचली.
स्वारगेट पुणे येथून गुरुवारी रात्री चालक डी. पी. सुरके ही पुणे-खेड बस भोरमार्गे खेडला पन्नास प्रवाशांसह घेवून जात असताना वाघजाई घाट उतरताना चालक सुरके यांच्या अचानक छातीत दुखू लागले. रात्रीची वेळ असल्याचे बसमधील बहुतेक प्रवासी झोपेत होते. सुरके यांची तब्येत बिघडल्याने त्यांचा बसवरील ताबा सुटला. ही बाब बसचे वाहक आणि काही प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केला. गाडी हेलपाटे घालत असल्याने प्रवासी घाबरले. त्याही परिस्थितीत चालक सुरके यांनी प्रसंगावधन राखून बसवर ताबा मिळवला. त्यामुळे बस खोल दरीत कोसळता कोसळता वाचवली.
चालक सुरके यांच्यावर महाडच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती महाड आगार प्रमुख प्रणील ठाकरे यांनी दिली. (वार्ताहर)

Web Title: Driver's conduction; The passengers of the passenger read