‘ड्रग्ज व्हाया कॉन्सर्ट’ पोलिसांचे दुर्लक्ष झाले का?पोलिसांच्या भूमिकेवर संशयाचे ढग; इव्हेंटमध्ये डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई ड्रग्जच्या नशेत होतेय बेधुंद

By मनीषा म्हात्रे | Updated: April 16, 2026 12:55 IST2026-04-16T12:55:25+5:302026-04-16T12:55:46+5:30

Mumbai Drugs Case: गेल्या वर्षभरात मुंबई पोलिसांनी ड्रग्जविरोधात धडक कारवायांद्वारे  ७,६२३ गुन्हे नोंदवत ६,७७७ जणांना अटक केली. यामध्ये ८५७.१२ काेटींचे १७५८.९७१ किलो ड्रग्ज जप्त केले आहे.

Did the police ignore the 'Drugs Via Concert'? Doubts over the role of the police; The youth dancing to the DJ's beats at the event was intoxicated with drugs | ‘ड्रग्ज व्हाया कॉन्सर्ट’ पोलिसांचे दुर्लक्ष झाले का?पोलिसांच्या भूमिकेवर संशयाचे ढग; इव्हेंटमध्ये डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई ड्रग्जच्या नशेत होतेय बेधुंद

‘ड्रग्ज व्हाया कॉन्सर्ट’ पोलिसांचे दुर्लक्ष झाले का?पोलिसांच्या भूमिकेवर संशयाचे ढग; इव्हेंटमध्ये डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई ड्रग्जच्या नशेत होतेय बेधुंद

- मनीषा म्हात्रे
मुंबई -  गेल्या वर्षभरात मुंबई पोलिसांनी ड्रग्जविरोधात धडक कारवायांद्वारे  ७,६२३ गुन्हे नोंदवत ६,७७७ जणांना अटक केली. यामध्ये ८५७.१२ काेटींचे १७५८.९७१ किलो ड्रग्ज जप्त केले आहे. यामुळे पोलिसांच्या कर्तबगारीचे कौतुक होत असतानाच गोरेगावमध्ये झालेल्या कॉन्सर्टमधील नेस्को ड्रग्ज पार्टीच्या प्रकाराने वेगळे वळण घेतले आहे. यामध्ये पोलिसांची भूमिका फक्त परवानगी एवढीच मर्यादित होती का, त्यांनी मुंबईसारख्या संवेदनशील शहरातील ‘कॉन्सर्ट’कडे दुर्लक्ष केले का? आदी प्रश्न उपस्थित होत आहेत. 

१९८० च्या दशकापासून सुरू  ‘रेव्ह पार्टी’ तरुणांना आकर्षित करत आहे. गेल्या काही वर्षांत त्यामध्ये धनाढ्यांच्या मुलांच्या साथीने मध्यमवर्गातील मुलेही अडकत आहेत. अशा पार्टी अत्यंत छुप्या पद्धतीने आयोजित करतात. त्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज, दारू, म्युझिक, नाचगाणे आणि काहीवेळा सेक्सचाही समावेश असतो. यात नवख्यांना प्रवेश देण्यात येत नाही. पार्टीमधील गुप्तता बाहेर येऊ नये, यासाठी ही दक्षता घेण्यात येते. ड्रग्जचे सेवन करणाऱ्यांसाठी आणि पेडलर्ससाठी या रेव्ह पार्टी ‘सॉफ्ट टार्गेट’ ठरतात. मात्र, त्यांनी आता कॉन्सर्टकडे मोर्चा वळवल्याचे दिसून येत आहे.

मुंबईत दरवर्षी  शेकडो कॉन्सर्ट होत आहेत. मात्र आतमध्ये डीजे, म्युझिकच्या तालावर थिरकणारी हायप्रोफाईल तरुणाई ड्रग्जच्या धुंदीत बेधुंद होत असल्याचे नेस्कोतील  दोघांच्या मृत्यूनंतर उजेडात आले. चार भिंतीआड खासगी संकुल, हॉलमध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमात पोलिस जास्त डोकावत नाहीत. याचाच फायदा घेत ड्रग्ज तस्करांनी हा सोपा मार्ग निवडल्याचे दिसून येते. नेस्को ड्रग्ज प्रकरणात उपचार घेत असलेल्या तरुण - तरुणींनी यापूर्वीच्या जिओ वर्ल्डच्या इव्हेंटमध्ये देखील ड्रग्ज घेतल्याचे सांगताच गेल्या अनेक दिवसांपासून ‘ड्रग्ज व्हाया कॉन्सर्ट’मधून तरुणाईपर्यंत पोहोचत असल्याचे स्पष्ट होते. याबाबत पोलिसांनाही माहिती नव्हते का? याबाबत चौकशीची मागणी हाेत आहे. 
यापूर्वी मुंबईतून खेडोपाड्यातील तरुणाईपर्यंत ड्रग्जचे पार्सल कुरियरद्वारे पोहोचत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कारवाईतून उघडकीस आली.  त्यामुळे ड्रग्जच्या वाढणाऱ्या विळख्यावर नियंत्रण आणण्याचे आव्हान आहे. 

रेव्ह पार्टी गुप्तपणे केली जाते. तपास यंत्रणांना थांगपत्ता लागू नये म्हणून निमंत्रणासाठी सोशल मीडिया आणि कोड भाषेचा वापर करण्यात येतो. जे ड्रग्ज कल्चरमध्ये सहभागी आहेत. त्यांचे छोटे-छोटे ग्रुप बनवण्यात येतात. त्यांच्या मार्फत आमंत्रण दिले जाते. 

कुरियर कंपन्या रडारवर
कुरियर ॲप कंपनीद्वारे पाठवण्यात येणाऱ्या ड्रग्ज पार्सलवरील नाव, पत्ता बनावट असल्याचेही तपासात समोर 
आले आहे. 
कुणाच्याही लक्षात येणार नाही, अशा पद्धतीने हे ड्रग्ज लपवण्यात आले होते. पहिल्यांदाच अशाप्रकारे तस्करीचे नव्या क्लुप्त्या समोर आल्या आहेत. त्यामुळे यात कुरियर कंपन्यांचा काही सहभाग आहे का, याबाबत यंत्रणा अधिक तपास करत आहे. 
विविध कुरियर कंपन्या रडारवर असून, त्याबाबत अधिक तपास सुरू असल्याचेही एका अधिकाऱ्याने सांगितले.

हे आहेत सप्लाय सेंटर
एक्स्टॅसी (एमडीएमए) हे एक सिंथेटिक पार्टी ड्रग आहे. मिथिलिनडायऑक्सी मेथॲम्फेटा माइन असे त्याचे पुर्ण नाव आहे. हे सर्वप्रथम १९१२ मध्ये जर्मनीतील कंपनीने तयार केले होते. आजच्या काळात हे ड्रग टॅब्लेट, कॅप्सूल, पावडर या स्वरूपात आढळते व मुख्यतः पार्टी, कॉन्सर्ट किंवा क्लबमध्ये वापरले जात आहे. 

कारवाईच्या कचाट्यात सापडलेल्या रेव्ह पार्टीज
२०१९ : जुहूच्या ओकवूड हॉटेलमधील छापेमारीत ९६ जण ताब्यात.  
२०११ : खालापूरमधील रेव्ह पार्टीवर रायगड पोलिसांची कारवाई. मुंबईच्या अँटी नार्कोटिक सेलचे अधिकारी अनिल जाधव यांना अटक; २७५ जणांनी नशा केल्याचे उघड.
२००९ : मुंबई जुहू परिसरातील बॉम्बे ७२ क्लबवर मुंबई पोलिसांचा छापा, २४६ मुले ताब्यात.  
२०२३ : कासारवडली येथील रेव्ह पार्टीवर ठाणे गुन्हे शाखेची कारवाई. 
२०२४ : कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टीवर एनसीबीची धाड. 

२०२५मध्ये : सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवल्याची सलीमची कबुली
मेफेड्रोन जप्त केल्याप्रकरणी अटक केलेल्या व महिन्याभरात दुबईतून हद्दपार केलेल्या मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेखची मुंबई पोलिसांसमोर कबुली, ‘हो, चित्रपट व फॅशन क्षेत्रातील सेलिब्रिटींसह गुंडांसाठी भारत व परदेशातातील रेव्ह पार्ट्यांमध्ये मीच ड्रग्ज पुरवले होते.’

Web Title : कॉन्सर्ट के माध्यम से ड्रग्स: पुलिस की लापरवाही या संदिग्ध भूमिका?

Web Summary : मुंबई में ड्रग्स से जुड़ी मौतों के बाद कॉन्सर्ट जांच के दायरे में। आयोजनों में ड्रग्स के इस्तेमाल की निगरानी को लेकर पुलिस पर सवाल, 'कॉन्सर्ट के माध्यम से ड्रग्स' युवाओं तक पहुंचने की चिंता। कूरियर कंपनियों पर भी ड्रग पार्सल के लिए जांच।

Web Title : Drugs via Concerts: Police Negligence or Suspicious Role?

Web Summary : Mumbai concerts under scrutiny after drug-related deaths. Police face questions regarding oversight of drug use at events, raising concerns about 'drugs via concerts' reaching youth. Courier companies are also under investigation for drug parcels.