धनंजय मुंडे, छगन भुजबळ सुखरूप; हेलिकॉप्टर भरकटल्याची चर्चा ही अफवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 13:42 IST2019-01-28T13:14:16+5:302019-01-28T13:42:25+5:30
धनंजय मुंडे, भुजबळांचे हेलिकॉप्टर भरकटल्याची अफवा असल्याची माहिती आता ट्वीटरवरून दिली आहे.

धनंजय मुंडे, छगन भुजबळ सुखरूप; हेलिकॉप्टर भरकटल्याची चर्चा ही अफवा
मुंबई - राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याचे वृत्त सोमवारी सकाळी (28 जानेवारी) समोर आले होते. मात्र धनंजय मुंडे यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.
कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सभेसाठी धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ जात असताना अचानक वाऱ्याच्या झोतामुळे त्यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याची सोशल मीडियावर चर्चा होती. मात्र याबाबत मुंडे यांनी स्वत: हेलिकॉप्टर भरकटल्याची केवळ अफवा असल्याची माहिती ट्वीटरवरून दिली आहे.
'मी बीड येथील गहिनीनाथगडाचा कार्यक्रम संपवून कोल्हापूरच्या सभेसाठी जात आहे. हेलिकॉप्टर भरकटल्याची बातमी चूक असून काहीही झालेले नाही, आम्ही 10 मिनिटांत कोल्हापूरच्या विमानतळावर उतरू. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये. माझ्यावर भगवंताची कृपा आणि जनतेच्या सदिच्छा आहेत' असं ट्वीट धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
मी बीड येथील गहिनीनाथगडाचा कार्यक्रम संपवून कोल्हापूरच्या सभेसाठी जात आहे. हेलिकॉप्टर भरकटल्याची बातमी चूक असून काहीही झालेले नाही, आम्ही 10 मिनिटांत कोल्हापूरच्या विमानतळावर उतरू. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये. माझ्यावर भगवंताची कृपा आणि जनतेच्या सदिच्छा आहेत. pic.twitter.com/3PQuA9xtnX
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 28, 2019