भेसळ करणाऱ्या टोळीला अटक

By Admin | Updated: March 13, 2015 01:14 IST2015-03-13T01:14:37+5:302015-03-13T01:14:37+5:30

पोईसर परिसरामध्ये असलेल्या झोपडपट्टीमध्ये आज पहाटे पाच वाजता छापा टाकून बोरीवली पोलिसांनी दूध भेसळ करणाऱ्या चार

Detainee gang arrested | भेसळ करणाऱ्या टोळीला अटक

भेसळ करणाऱ्या टोळीला अटक

मुंबई : पोईसर परिसरामध्ये असलेल्या झोपडपट्टीमध्ये आज पहाटे पाच वाजता छापा टाकून बोरीवली पोलिसांनी दूध भेसळ करणाऱ्या चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी पिशवीतील आणि सुटे असे जवळपास १४० लिटर दूध, नामांकित दूध कंपन्यांच्या रिकाम्या पिशव्या हस्तगत केल्या आहेत. पोईसरमध्ये दूध भेसळ केली जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती,
त्यानुसार आमच्या पथकाने आज पहाटे पाचच्या सुमारास या परिसरात धाड टाकून रमेश निमान (४८), सुजाता निमान (४२), गणेश गोलाला (३०) आणि सैदुल शिंजारी (३५) यांना अटक केल्याची माहिती या विभागाचे पोलीस उपायुक्त बालसिंग राजपूत यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Detainee gang arrested